- व्हीव्हीएस लक्ष्मण
आयपीएल-१४ची यापेक्षा चांगली सुरुवात काय असावी. पाचवेळेचा विजेता मुंबई इंडियन्स आणि स्टार खेळाडूंचा भरणा असलेला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सलामीला भिडले. अखेरच्या चेंडूपर्यंत थरार रंगला. पाच गडी बाद करणारा हर्षल पटेल याचे कौशल्य पुढे आले. आयपीएल हे टॅलेंटला संधी देणारे प्लॅटफॉर्म आहे. हर्षल काही महिन्यांपासून चर्चेत होताच मात्र अशा प्रकारची कामगिरी तुमचा आत्मविश्वास वाढवितो.
पृथ्वी शॉ याला मुक्तपणे फलंदाजी करताना पाहणे फारच रंजक होते. त्याची धावा काढण्याची पद्धत पाहताना भारतीय संघातील स्थान गमविण्याचे दु:ख असल्याचे वारंवार जाणवत होते. पृथ्वीसारख्या युवा खेळाडूमध्ये बरेच काही शिल्लक आहे. अशा खेळाडूंचा खेळ बहरला की बरे वाटते.
आम्ही झेल चांगले टिपले असले तरी क्षेत्ररक्षणामध्ये आमची ऊर्जा कमी पडली. ही मोसमातील पहिली लढत होती. त्यामुळे ज्या कमकुवत बाजू आहेत त्यावर मेहनत घ्यावी लागेल. आम्ही यानंतर बुधवारी बँगलोरविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत दमदार पुनरागमन करू, असा मला विश्वास आहे. आम्ही केकेआर संघाला अपेक्षेपेक्षा १५-२० धावा अधिक फटकावण्याची संधी दिली. फलंदाजीची खोली बघता लक्ष्याचा पाठलाग करताना आम्हाला विजयाचा विश्वास होता. डेव्हिड वॉर्नर व वृद्धिमान साहा सुरुवातीला लवकर बाद झाल्यामुळे आमच्या योजना ढासळल्या, पण जॉनी बेयरस्टॉ व मनीष पांडे यांनी डाव सावरला. जॉनीने शानदार खेळी केली. तो आम्हाला केन विलियम्सनसह आवश्यक आहे. पण, बेयरस्टॉ बाद झाल्यानंतर आम्ही पिछाडीवर पडलो. अब्दुल समद फलंदाजीला आला त्यावेळी आम्हाला १२ चेंडूंमध्ये विजयासाठी ३८ धावांची गरज होती. त्याने पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आपली क्षमता सिद्ध केली. त्याने व मनीष पांडेने विजय मिळवून दिला असता तर शानदार ठरले असते.
- रविवारी केकेआरविरुद्ध सनरायजर्स हैदराबादचा पराभव आमच्यासाठी निराशादायी ठरला. दहा धावांचा फरक हा चुरशीचा सामना झाल्याची साक्ष देतो. आम्ही दोन चांगले फटके मारण्यात अपयशी ठरल्याने विजयापासून वंचित राहिलो. माझ्या मते, कुठल्याही स्तरावरील ही परिपूर्ण कामगिरी नव्हतीच. गोलंदाजांना महेनत घ्यावीच लागेल.
- आमच्या गोलंदाजीत विविधता आहे, पण पॉवर प्लेदरम्यान नको तसे चेंडू टाकल्याने नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी यांना संधी मिळाली. राशिद खान हा याला अपवाद ठरला. त्याचे संमोहित करणारे चेंडू न्याहाळणे नेहमी पर्वणी ठरते.
Web Title: IPL 2021: Sunrisers need to improve fielding, bowling, Johnny Bairstow
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.