मुंबई : आयपीएलमध्ये अनेक खेळाडू असे आहेत ज्यांनी विक्रमांचे डोंगर रचले आहेत. त्यामुळेच प्रत्येक सामन्यांत या स्टार क्रिकेटपटूंकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असतात. सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक धावा, सर्वाधिक बळी, सर्वाधिक विजय असे अनेक विक्रम जाणून घेण्याची क्रिकेटप्रेमींची उत्सुकता असते. असा एक हटके विक्रम रचला आहे तो चेन्नई सुपरकिंग्सचा चिना थाला नावाने ओळखला जाणाऱ्या सुरेश रैनाने.
आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला; शुबमन गिलला गिफ्ट म्हणून पाठवली Mahindra Thar, खेळाडू म्हणाला...
आयपीएलमध्ये सर्वाधिक फॅन फॉलोअर्स असलेल्या संघांमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा समावेश आहे. सीएसकेमध्ये सर्वाधिक क्रेझ आहे ती महेंद्रसिंग धोनीची. धोनीनंतर सर्वाधिक फेमस आहे तो सुरेश रैना. कोणताही सामना आपल्या एकट्याच्या जोरावर जिंकवण्यात रैना तरबेज आहे. अनेकदा त्याने प्रतिकूल परिस्थितीत तडाखेबंद फलंदाजी करत चेन्नईला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले आहे. बरं, त्याने अशी कामगिरी सातत्याने केली असल्याने एका अनोख्या विक्रमाचीही त्याच्या नावावर नोंद झाली आहे. (IPL 2021 Suresh Raina record highest runs in csk victory)
तो विक्रम म्हणजे संघाच्या विजयात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम. रैनाने चेन्नईकडून खेळताना संघाच्या विजयामध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम रचला. विशेष म्हणजे यावेळी त्याने मुंबई इंडियन्सचा ‘हिटमॅन’ आणि कर्णधार रोहित शर्मा याला मागे टाकले आहे. रैनाने आतापर्यंत १९६ आयपीएल सामने खेळले असून यामध्ये त्याने एकूण ५,४४८ धावा फटकावल्या आहेत. मात्र, त्याने चेन्नईच्या विजयातही मोलाचे योगदान दिले आहे.
धोनीचं फलंदाजीऐवजी 'या' गोष्टीकडे जास्त लक्ष; अजित आगरकर स्पष्टच बोलले!
चेन्नईच्या विजयामध्ये निर्णायक कामगिरी करतान रैनाने आतापर्यंत सर्वाधिक ३,४८४ धावा फटकावल्या आहेत. सोमवारी झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धही त्याने १५ चेंडूंत १८ धावांची खेळी केली. चेन्नईने राजस्थानविरुद्ध ४५ धावांनी बाजी मारली. रैनानंतर सर्वाधिक यशस्वी ठरला तो मुंबईचा रोहित शर्मा. रोहितने आतापर्यंत एकूण २०३ आयपीएल सामने खेळताना ५,३२४ धावा केल्या असून संघाने मिळवलेल्या विजयात त्याने ३,४३८ धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी सुरेश रैना पॉवरफुल क्रिकेटपटू ठरला आहे.
संघाच्या विजयात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :१. सुरेश रैना, सीएसके : ३,४८४२. रोहित शर्मा, मुंबई : ३,४३८३. डेव्हीड वॉर्नर, हैदराबाद : ३,१५८४. शिखर धवन, दिल्ली : ३,१४८