मागच्यावर्षी यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) होता. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी CSK च्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाली, त्यानंतर संघातील प्रमुख खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) यूएईतून मायदेशात परतला, त्यानंतर त्याच्या आणि धोनीच्या वादाच्या चर्चाही रंगल्या. अशात रैना CSKच्या ताफ्यात दिसेल की नाही, यावरही बरेच तर्क लावले गेले. पण, अखेर सुरेश रैना चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला. MS Dhoni Labourer : महेंद्रसिंग धोनी, आंद्रे रसेल बनले मजूर; IPL 2021च्या आधी मोठा घोटाळा उघड
चेन्नई सुपर किंग्सचे सुरुवातीचे पाच सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत आणि त्यासाठी सर्व खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत. रैनाही बुधवारी CSKच्या ताफ्यात दाखल झाला आणि त्यानं धोनीची भेट घेतली. या दोघांनी नेट्समध्ये एकत्र सरावही केला. CSKनं या दोन प्रमुख खेळाडूंच्या भेटीचं वर्णन 'Anbu Moments' असं केलं. त्यांनी या दोघांचा खास व्हिडीओही पोस्ट केला. IPL 2021 : बायो बबलला आणखी एक खेळाडू वैतागला, यावेळी महेंद्रसिंग धोनीच्या CSK ला फटका बसला
यावर रैनानंही भावनिक पोस्ट लिहिली. त्यानं लिहिलं की, नजरेनं नव्हे तर नेहमी हृदयानं एकत्र आहोत.
धोनी आणि रैना या दोघांनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २००८ पासून हे दोघेही CSKचे सदस्य आहेत. CSKवर दोन वर्षांची बंदी झाली तेव्हा हे दोघं वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळले होते. चेन्नईकडून सुरेश रैनानं सर्वाधिक ४५२७ धावा केल्या आहेत, तर धोनीच्या नावावर ४०५८ धावा आहेत.
Web Title: IPL 2021 : Suresh Raina shares 'heart to heart' picture with MS Dhoni, wows CSK fans with his caption, watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.