IPL 2021 Suspended : इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व स्थगित झाल्यानंतर परदेशी खेळाडूंमध्ये मायदेशात जाण्याची ओढ वाढली आहे. पण, भारतातील कोरोना परिस्थिती पाहता, अनेक देशांनी विमानसेवा रद्द केल्या आहेत. त्यात आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी वाईट बातमी समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी CEO निक हॉकली ( Nick Hockley )यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशात आणण्यासाठी चार्टर्ड फ्लाईटची लवकरात लवकर सोय करण्याचा कोणताही प्लान नाही. डॅडी लवकर घरी या, आम्ही तुम्हाला मिस करतोय!; डेव्हिड वॉर्नरच्या मुलीची भावनिक पोस्ट व्हायरल!
मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनाही यातून सवलत मिळणार नसल्याचं मॉरिसन यांनी तेव्हाच स्पष्ट केलं होतं. ''चार्टर्ड फ्लाईटची सोय करण्याचा प्रस्ताव अद्याप विचाराधीन नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनसोबत आम्ही सातत्यानं चर्चा करत आहोत. सोबतच बीसीसीआय व आमच्या खेळाडूंशीही चर्चा सुरू आहे. बीसीसीआय आम्हाला खेळाडूंबाबत सर्व अपडेट्स देत आहेत. आम्ही खेळाडूंच्या टचमध्ये आहोत आणि ते सकारात्मक आहेत. बीसीसीआयनं तयार केलेल्या बायो बबलमध्ये ते स्वतःला सुरक्षित समजत आहेत,''असे हॉकली यांनी सांगितले. आता आम्ही घरी जायचं कसं ?; BCCI कडूनही उत्तर मिळेना, परदेशी खेळाडू झालेत असहाय व चिंताग्रस्त!
कोणत्या देशात आहे भारतीय विमानांवर बंदी...
- ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन सरकारनं १५ मे पर्यंत भारतातील विमान वाहतुकीला बंदी घातली आहे. पण, आता भारतात अडकलेल्या खेळाडूंना परत आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन हे सरकारशी चर्चा करत आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारनं भारतातून येणाऱ्या नागरिकांवर पाच वर्षांची जेल किंवा ५० लाखांचा दंड भरण्याची शिक्षा करण्याची धमकी दिली आहे.
- इंग्लंड - भारतातून येणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंना आता त्यांच्या सरकारच्या मान्यताप्राप्त हॉटेलमध्ये १० दिवसांच्या विलगीकरणात रहावे लागेल. या दहा दिवसांत दुसऱ्या व आठव्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी केली जाईल आणि त्यानंतरच त्यांना लंडनमध्ये दाखल होण्याची परवानगी मिळेल.
- न्यूझीलंड - न्यूझीलंड सरकारनं अद्याप असा कोणताच नियम काढलेला नाही, त्यामुळे भारतातील त्यांच्या खेळाडूंना मायदेशात परतण्यासाठी काही अडचण येणार नाही.
- बांगलादेश - भारतातून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे, परंतु जमिनीमार्गे खेळाडूंना मायदेशात जाता येईल, परंतु त्यांना १४ दिवसांच्या विलगीकरणात रहावे लागेल.
- दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज - या देशातील खेळाडू मायदेशात जाऊ शकतात, परंतु त्यांना थेट विमानसेवा नाही आणि त्यांना UAE मार्गे जावं लागेल. पण, UAEनंही भारतातून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घातली आहे.