आयपीएल २०२१ स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या विमान वाहतुकीवर ऑस्ट्रेलियन सरकारनं बंदी घातली आहे. त्यामुळे ऑसी खेळाडू आता मालदीव किंवा श्रीलंकेत आसरा घेण्याचा पर्याय शोधत होते. त्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मोठे अपडेट्स देणारी माहिती गुरुवारी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सुरक्षितरित्या भारत सोडले असून ते मालदीवच्या दिशेनं प्रवास करत आहेत, अशी माहिती देण्यात आली. पण, त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल हसी हा भारतातच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. World Test Championship : भारतीय संघाला बदलावा लागला प्लान; IPL 2021 स्थगितीचा परिणाम!
''क्रिकेट ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोशिएशन हे सांगू इच्छितो की, ऑस्ट्रेलियन खेळाडू, सामनाधिकारी व समालोचक यांनी सुरक्षितरित्या भारत सोडलं असून ते मालदिवच्या दिशेनं रवाना झाले आहेत. भारतातून येणाऱ्या विमानप्रवासाला सुरुवात होईपर्यंत, ऑस्ट्रेलियन सदस्य मालदिवमध्ये राहतील. क्रिकेट ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन यांना ऑस्ट्रेलियन सरकारकडून कोणतीच सूट नकोय.'' ट्वेंटी-२० लीगसाठी करार करण्यापूर्वी गृहपाठ करा; ACAनं ऑस्ट्रेलियन खेळाडूंना झाप झाप झापलं
BCCIनं केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार. दोन दिवसांपेक्षा कमी कालावधीत त्यांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी मालदिवला जाण्याची सोय केली आहे. मायकल हसी याला कोरोना झाल्यामुळे तो भारतातच उपचार घेण्यासाठी राहणार आहेत. हसीची प्रकृती ठणठणीत आहे.
- चेन्नई सुपर किंग्स - जेसन बेहरनडॉर्फ, मायकेल हसी
- दिल्ली कॅपिटल्स - स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, रिकी पाँटिंग, जेम्स होप्स
- कोलकाता नाईट रायडर्स - पॅट कमिन्स, बेन कटिंग, डेव्हिड हसी
- मुंबई इंडियन्स - नॅथन कोल्टर-नील, ख्रिस लिन
- पंजाब किंग्स - मोईजेस हेन्रीक्स, झाय रिचर्डसन, रिलेय मेरेडिथ, डॅमिएन राईट
- रॉयल चॅलेंजर्स बँगलोर - ग्ले मॅक्सवेल, डॅन ख्रिस्टियन, डॅनिएल सॅम्स, सायमन कॅटिच, अॅडम ग्रिफीथ
सनरायझर्स हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर, टॉम मुडी, ट्रेव्हर बायलिस, ब्रॅड हॅडीन