कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्थी व संदीप वॉरियर्स हे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले अन् आयपीएल २०२१ स्थगित करावी लागली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा लक्ष्मीपती बालाजी व मायकल हस्सी, सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. KKRचे टीम सेइफर्ट व प्रसिद्ध कृष्णा यांनाही कोरोना झाला. त्यामुळे आयपीएलचा दुसरा टप्प्यावर अनिश्चिततेचं सावट आले आहे. आयपीएल स्थगितीची निर्णय झाल्यानंतर दुसरा टप्पा कधी व कुठे, याबाबत चर्चा सुरू आहे. यूएई, इंग्लंड, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया असे चार पर्याय बीसीसीआयसमोर आहेत, परंतु आता दुसरा टप्पा कुठेही झाला तरी इंग्लंडचे खेळाडू सहभाग घेणार नाहीत. असे वृत्त समोर आले आहे. ( England players unlikely to be involved in rescheduled IPL 2021) सुरेश रैना आणि त्याच्या पत्नीवर कोसळला दुःखाचा डोंगर, कोरोनामुळं कुटुंबातील सदस्याचे निधन
इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात सहभाग घेता येणं अवघड आहे. आयपीएल २०२१साठी इंग्लंडच्या खेळाडूंना खेळता यावं, यासाठी इंग्लंड संघ व्यवस्थापनानं डझनभर खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळण्याची मुभा दिली होती. पण, आता ही स्पर्धा स्थगित झाली आणि इंग्लंडचे खेळाडू मायदेशी परतले आहेत. इंग्लंड पुरुष क्रिकेट संघाचे संचालक अॅश्ली जाईल्स यांनी, आता आयपीएलचा दुसरा टप्पा हा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये व्यत्यय आणणारा असेल, अते मत व्यक्त केले. भारताच्या सीनियर खेळाडूंना बंधनं आवडत नव्हती, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून बायो-बबलबाबत गौप्यस्फोट!
आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी बीसीसीआय सप्टेंबर महिन्याचा विचार करत आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा होण्यापूर्वी आयपीएल २०२१चे उर्वरित ३१ सामने खेळवण्याचा विचार सुरू आहे. नोव्हेंबर मध्यंतरानंतरचीही विंडोची चाचपणी सुरू आहे, परंतु इंग्लंडचे अव्वल खेळाडू या दोन्ही विंडोत आयपीएलमध्ये खेळू शकत नाही. इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय वेळापत्रक मार्च २०२२पर्यंत ठरले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता जाईल्स यांनी फेटाळून लावली आहे. भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जवळपास निश्चित, जाणून घ्या टीम इंडियाचे नेतृत्व कोणाच्या खांद्यावर!
''इंग्लंडच्या खेळाडूंनी राष्ट्रीय सामनेच खेळावेत. आमचा आंतरराष्ट्रीय वेळापत्रक ठरलं आहे. त्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाकिस्तान व बांगलादेश दौऱ्यांचा समावेश आहे. त्या दौऱ्यासाठी खेळाडूंनी राष्ट्रीय संघातोबतच राहणे मला अपेक्षित आहे,''असे जाईल्स यांनी सांगितले आहे. आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा कधी होईल, याची सध्यातरी कल्पना नाही. आमच्यासमोर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप व अॅशेल मालिका असे महत्त्वाचे दौरे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. २४ जणांना मिळालंय इंग्लंड दौऱ्याचं तिकीट, पण यातील किती जणं बसणार विमानात?; BCCI च्या नियमानं खेळाडू टेंशनमध्ये