IPL 2021 suspended : इंडियन प्रीमिअर लीगचा १४ वे पर्व स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी बीसीसीआयनं जाहीर केला. त्याचबरोबर बीसीसीआयनं सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांकडे जाण्याची मुभा दिली, परंतु परदेशी खेळाडू चिंताग्रस्त झाले आहेत. आपण घरी कसे जाणार, याबाबत त्यांना काहीच कल्पना नाही. InsideSport.co यांनी दिल्लीमध्ये आता मुक्कामाला असलेल्या तीन परदेशी खेळाडूंशी चर्चा केली आणि त्यांनी घरी कसं जाणार, याबाबत काहीच कल्पना दिली नसल्याची माहिती दिली. विशेष करून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचं टेंशन वाढलं आहे. लोकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीच तडजोड करायची नव्हती; बीसीसीआय सचिव जय शाह
''ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. आम्ही ऑस्ट्रेलियात कसं जाणार, याबाबत मी आताच फ्रँचायझी मॅनेजरशी बोललो. त्यांनी आम्हाला वाट पाहण्यास सांगितले आहेत, त्यांनाही बीसीसीआयच्या सूचनांची प्रतीक्षा आहे. माझ्यासह अन्य ऑस्ट्रेलियन सहकारी चिंतेत आहेत. केव्हा आणि कसं आम्ही मायदेशात परतणार?,''असं एका ऑसी खेळाडूनं InsideSport.co शी बोलताना सांगितले. आयपीएलमधील सर्व खेळाडूंना घरी परतण्याची BCCIनं दिली परवानगी, आता पुढे काय?
सनरायझर्स हैदराबादच्या एका परदेशी खेळाडूनं सांगितले की,''मी सकाळीच मायकेल स्लेटर याच्याशी बोललो. ते मालदिवला अडकले आहेत, कुठे जायचं हेच त्यांना सुचत नाही. आम्हाला अशा परिस्थितीत अडकायचे नाही. बीसीसीआय आणि फ्रँचायझी आम्हाला मायदेशात सुखरूप पोहोचवण्यासाठी काहीतरी करतील, असा विश्वास मला आहे. मला आता इथे एक क्षणही थांबायचे नाही.'' उर्वरित स्पर्धा मुंबईत की थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर?; फ्रँचायझीमध्ये पडले दोन गट!
- देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अनेक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घातली आहे.
- ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन सरकारनं १५ मे पर्यंत भारतातील विमान वाहतुकीला बंदी घातली आहे. पण, आता भारतात अडकलेल्या खेळाडूंना परत आणण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया व ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन हे सरकारशी चर्चा करत आहेत. ऑस्ट्रेलियन सरकारनं भारतातून येणाऱ्या नागरिकांवर पाच वर्षांची जेल किंवा ५० लाखांचा दंड भरण्याची शिक्षा करण्याची धमकी दिली आहे.
- इंग्लंड - भारतातून येणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंना आता त्यांच्या सरकारच्या मान्यताप्राप्त हॉटेलमध्ये १० दिवसांच्या विलगीकरणात रहावे लागेल. या दहा दिवसांत दुसऱ्या व आठव्या दिवशी त्यांची कोरोना चाचणी केली जाईल आणि त्यानंतरच त्यांना लंडनमध्ये दाखल होण्याची परवानगी मिळेल.
- न्यूझीलंड - न्यूझीलंड सरकारनं अद्याप असा कोणताच नियम काढलेला नाही, त्यामुळे भारतातील त्यांच्या खेळाडूंना मायदेशात परतण्यासाठी काही अडचण येणार नाही.
- बांगलादेश - भारतातून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे, परंतु जमिनीमार्गे खेळाडूंना मायदेशात जाता येईल, परंतु त्यांना १४ दिवसांच्या विलगीकरणात रहावे लागेल.
- दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज - या देशातील खेळाडू मायदेशात जाऊ शकतात, परंतु त्यांना थेट विमानसेवा नाही आणि त्यांना UAE मार्गे जावं लागेल. पण, UAEनंही भारतातून येणाऱ्या विमानसेवेवर बंदी घातली आहे.