न्यूझीलंडच्या चार खेळाडूंनी सर्वांना चकवा दिला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेसह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीच्या न्यूझीलंड संघातील चार सदस्य मायदेशात रवाना न होता भारतातच थांबले होते. नवी दिल्ली येथे त्यांच्यासाठी मिनी बायो बबल तयार करण्यात आले होते आणि तेथूनच ११ मे ला ते लंडनसाठी रवाना होणार होते. पण, खरं तर त्यांनी दिल्ली सोडली असून ते मालदिवला पोहोचल्याचे वृत्त समोर येत आहे. नवी दिल्ली सुरक्षित नसल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला, परंतु त्याबद्दल कुणालाच पत्ता लागू दिला नाही. KKRच्या ताफ्यातील किवी फलंदाजाला कोरोना; मायदेशात रवाना होण्यापूर्वी आला रिपोर्ट अन्...
Cricbuzz नं दिलेल्या आधीच्या वृत्तानुसार केन विलियम्सन, कायले जेमिन्सन, मिचेल सँटनर व फिजिओ टॉमी सिम्सेक हे दिल्ली येथील बायो बबलमध्ये थांबले होते. न्यूझीलंड क्रिकेटनंही त्याला दुजोरा दिला होता. त्यानंतर येथूनच हे खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी व इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी लंडनला रवाना होणार होते. मात्र, शुक्रवारी ते अन्य सहकाऱ्यांसोबत आणि चेन्नई सुपर किंग्समधील ऑसी खेळाडूंसोबत मालदिवला रवाना झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
''नवी दिल्ली येथील बायो बबलमध्ये चार खेळाडूंना असुरक्षित वाटत असल्याचे आम्हाला कळवण्यात आले आणि इथून लंडनला कधी जाता येईल, याची कल्पनाही त्यांना नव्हती. इथे त्यांना अधिक काळ राहायचे नव्हते आणि त्यामुळे त्यांनी CSKमधील ऑसी खेळाडूंसह मालदिवला जाण्याचा निर्णय घेतला,''असे फ्रँचायझीच्या अधिकाऱ्यानं सांगितले. WTC Final : जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; हार्दिक पांड्या, पृथ्वी शॉ यांना संधी नाही
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा हे खेळाडू मालदिवसाठी रवाना झाले, तेव्हा न्यूझीलंड क्रिकेटचं एक स्टेटमेंट आलं आणि त्यांनी हे खेळाडू नवी दिल्लीत बायो बबलमध्ये असून ११ मे ला लंडनसाठी रवाना होतील, असे म्हटलं. यासंदर्भात न्यूझीलंड क्रिकेट किंवा CEO डेव्हिड व्हाईट यांच्याकडून काहीच अपडेट्स मिळाले नाही. पण, CSKच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''न्यूझीलंडच्या खेळाडूंना आधी वाटले की त्यांना ११ मे ला लंडनला जाण्याची परवानगी मिळेल, परंतु त्यांना १६ मे पर्यंत प्रतीक्षा पाहावी लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी मालदीवला जाण्याचा निर्णय घेतला. ''