IPL 2021 Suspended : कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंच्या मार्फत कोरोना व्हारसरनं आयपीएल २०२१साठी तयार केलेला बायो बबल भेदला अन् स्पर्धा स्थगितीचा निर्णय घ्यावा लागला. KKRचा वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स यांच्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा लक्ष्मीपती बालाजी व मायकल हस्सी, दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा अन् सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान सहा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर आयपीएल २०२१स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. बीसीसीआयनं तयार केलेल्या बायो-बबलमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या बातम्या त्यानंतर समोर येऊ लागल्या. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झम्पा यानं यूएईतील बायो बबल अधिक सुरक्षित असल्याचा दावा केला होता. आता मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पॅम्मेंट ( Mumbai Indians fielding coach James Pamment) यांनी भारताच्या सीनियर खेळाडूंना बंधन आवडत नसल्याचा दावा केला आहे.आयपीएल रद्द झाल्यानंतर टीम सेइफर्ट व प्रसिद्ध कृष्णा या KKRच्या खेळाडूंचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला.
न्यूझीलंडच्या खेळाडूंसह पॅम्मेंट नुकतेच मायदेशात परतले. यावेळी पॅम्मेंट यांनी भारताचे काही सीनियर खेळाडूंना हे करू नका असे सांगणए किंवा बंधनं आवडत नसल्याचा दावा केला. पण, तरीही आयपीएल २०२१साठीच्या बायो बबलमध्ये सुरक्षित वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई इंडियन्सनं पहिले पाच सामने चेन्नईत खेळले आणि त्यानंतर ते नवी दिल्ली येथे दाखल झाले. पॅम्मेंट हे ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, जेम्स निशॅम आणि गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांच्यासह ऑकलंडला दाखल झाले. २४ जणांना मिळालंय इंग्लंड दौऱ्याचं तिकीट, पण यातील किती जणं बसणार विमानात?; BCCI च्या नियमानं खेळाडू टेंशनमध्ये
पॅम्मेंट यांनी सांगितले की,''भारताच्या काही सीनियर खेळाडूंना बंधनं आवडत नव्हती. त्यांना हे करू नये, असे सांगणेही पसंत नव्हते, परंतु तरीही आम्ही सुरक्षित होतो. बायो बबलबाबत कोणताच हलगर्जीपणा आम्हाला जाणवला नाही.''
भारताच्या काही खेळाडूंच्या कुटुंबीयांची प्रकृतीही बिघडली होती, परंतु त्यातही खेळाडूंनी स्पर्धेत खेळणे सुरू ठेवले. या लीगचा सदस्य असल्याचा अभिमान वाटत असल्याचेही पॅम्मेंट यांनी स्पष्ट केले. भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवलं, अनेक स्टार खेळाडू दिले अन् आता राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर विराजमान होणार!
मुंबई इंडियन्सनं ७ सामन्यांत ४ विजय व ३ पराभवासह ८ गुणांची कमाई केली होती. क्विंटन डी कॉकचा हरवलेला फॉर्म परत येणे ही संघासाठी चांगली बातमी होती. रोहित शर्मा सातत्यानं त्याची भूमिका चोख बजावत होता. सूर्यकुमार यादव व इशान किशन यांनी मागच्या वर्षी जी हवा केली होती, ती यंदा गायब झाल्याचे चित्र होते. कृणाल व हार्दिक या पांड्या ब्रदर्सना MI आणखी किती पोसणार हा सवाल, आता प्रत्येक जण विचारू लागला नाही. दोघांनाही अपेक्षांवर खरं उतरता आलेलं नाही. त्यामुळे किरॉन पोलार्डवर मोठा भार पडला. गोलंदाजीत राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह यांची कामगिरी समाधानकारक झालेली होती. भारताच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जवळपास निश्चित, जाणून घ्या टीम इंडियाचे नेतृत्व कोणाच्या खांद्यावर!