कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2020) संपूर्ण १३वं पर्व यूएईत खेळवल्यानंतर आयपीएलचं भारतात पुनरागमन होत आहे. BCCIनं रविवारी IPL 2021 Schedule जाहीर केलं. ९ एप्रिल ते ३० मे या कालावाधीत आयपीएलचे सामने होणार आहेत. गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Banglore) यांच्यात चेन्नईत सलामीचा सामना रंगणार आहे. देशातील कोरोना परिस्थिती पाहता, स्टेडियमवर प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. IPL 2021 full Schedule
मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरू या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यात येणार आहेत. आयपीएलच्या १४ व्या पर्वातील पहिले ३६ सामने चेन्नई, अहमदाबाद, मुंबई व दिल्ली येथे होतील आणि उर्वरित २० सामने बंगळुरू व कोलकाता येथे होतील. पश्चिम बंगालमध्ये मार्च अखेरीस ते एप्रिल अखेरीस निवडणुका असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांसाठी ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थिती देण्यात आली होती. पण, आयपीएलमध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्यात आलेली नाही. कारण, द्विदेशीय देशांमध्ये ही लीग होणार नसून ८ फ्रँचायझी खेळणार आहेत, त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला गेला आहे. दोन संघांचं बायो-बबलचे नियोजन सहज करता येते, परंतु ८ संघाचे थोडे अवघड आहे. वन डेतील पहिले वैयक्तिक द्विशतक ते अनेक विक्रम; मुंबई इंडियन्सकडून महिला क्रिकेटपटूंना मानाचा मुजरा
दरम्यान, पंजाब किंग्सची सह मालक आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा ( Punjab Kings’ co-owner Preity Zinta ) हीनं वेळापत्रकावर प्रतिक्रिया दिली आहे. ''अखेर आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं. पंजाब किंग्स पहिला सामना आमच्या मुंबईत खेळेल आणि तिथून चेन्नई, अहमदाबाद व बंगळुरू येथे जाईल. एकाही संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नसल्यान थोडं विचित्र वाटतंय आणि शिवाय प्रेक्षकही मॅच पाहायला नसतील.''