मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएलमध्ये विजयी मार्गावर परतण्यासाठी शुक्रवारी पंजाब किंग्सच्या बलाढ्य फलंदाजीविरुद्ध गोलंदाजीमध्ये सुधारणा करीत उतरावे लागेल. चेन्नईला सलामी लढतीत दिल्ली कॅपिटल्सने ७ गड्यांनी पराभूत केले होते, तर पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध चार धावांनी विजय मिळवला होता. वानखेडे स्टेडियममध्ये दवाची भूमिका लक्षात घेता नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास उत्सुक राहील.
चेन्नईने येथे पहिल्या लढतीत ७ बाद १८८ धावा केल्या होत्या. त्यात सुरेश रैना (५४), मोईन अली (३६) व सॅम कुरेन (३४) यांचे योगदान महत्त्वाचे ठरले होते. सलामीवीर फलंदाज रितुराज गायकवाड, फाफ ड्युप्लेसिस व धोनी यांना त्या सामन्यात विशेष कामगिरी बजावता आली नव्हती. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांना धावसंख्येचा बचाव करता आला नाही. शिखर धवन व पृथ्वी शॉ यांनी सलामीला १३८ धावांची भागीदारी करीत दिल्ली संघाला सहज विजय मिळवून दिला.
कमजोर बाजूचेन्नई :धोनी, रितुराज, फाफ ड्युप्लेसिस आऊट ऑफ फॉर्म. पंजाब : गोलंदाजी चिंतेचा विषय. झाय रिचर्डसन व रिले मेरिडथ महागडे ठरले.
मजबूत बाजूचेन्नई : रैना, मोईन अली, सॅम कुरेन शानदार फॉर्मात. धोनीसारखा कुशल कर्णधार. ड्युप्लेसिसमध्ये एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता.पंजाब : रोहित शर्माचे कल्पक नेतृत्व. ख्रिस लिनचा शानदार फॉर्म. जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांचा समावेश.केएल राहुल, ख्रिस गेल, दीपक हुडा यांचा शानदार फॉर्म. मोहम्मद शमी व अर्शदीपच्या समावेशामुळे गोलंदाजी आक्रमण मजबूत.