चेन्नई : माजी चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आज, रविवारी येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लढतीत संघाचा योग्य समतोल साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. ‘केकेआर’चे नेतृत्व यावेळी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक इयोन मॉर्गन करीत आहे. त्याने गेल्या मोसमात यूएईमध्ये दिनेश कार्तिककडून स्पर्धेच्या मध्यात कर्णधारपद सांभाळले होते. गेल्या मोसमात केकेआरचे सनरायझर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसह समान गुण होते. केकेआर रनरेटमध्ये पिछाडीवर पडला होता आणि सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला.मॉर्गन प्रथमच पूर्णकालिक कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. अशा स्थितीत सर्वांची नजर इंग्लंडच्या वन-डे विश्वकप विजेत्या कर्णधारावर असेल. मॉर्गन दोन वेळच्या आयपीएल चॅम्पियन संघाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रतिबद्ध आहे.
कमजोर बाजूकेकेआर : संघाचा समतोल साधण्याचे आव्हान.हैदराबाद : विदेशी खेळाडूंना सूर गवसणे महत्त्वाचे
मजबूत बाजूकेकेआर : शुभमन गिलच्या रूपाने आघाडीच्या फळीत शानदार फलंदाज.राहुल त्रिपाठी, नितीश राणा व अनुभवी दिनेश कार्तिकच्या रूपाने चांगले भारतीय फलंदाज. या व्यतिरिक्त मॉर्गन कुठल्याही आक्रमणाविरुद्ध धावा फटकावण्यास सक्षम.हैदराबाद : वेगवान गोलंदाज भुवनेश्वरच्या पुनरागमनामुळे गोलंदाजी मजबूत. यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनचाही समावेश.