IPL 2021: पंजाबचे २२ कोटींचे दोन गोलंदाज मैदानावरही ठरतायत महागडे!

मुंबई : पंजाब किंग्ज संघ यंदाच्या आयपीएलमध्ये नव्या नावाने आणि नव्या लोगोसह मैदानात उतरले. पण त्यांचे नशीब मात्र काही बदलले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 02:51 PM2021-04-27T14:51:29+5:302021-04-27T14:53:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Two Punjab bowlers worth Rs 22 crore are too expensive on the field! | IPL 2021: पंजाबचे २२ कोटींचे दोन गोलंदाज मैदानावरही ठरतायत महागडे!

IPL 2021: पंजाबचे २२ कोटींचे दोन गोलंदाज मैदानावरही ठरतायत महागडे!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : पंजाब किंग्ज संघ यंदाच्या आयपीएलमध्ये नव्या नावाने आणि नव्या लोगोसह मैदानात उतरले. पण त्यांचे नशीब मात्र काही बदलले नाही. संघाच्या निराशाजनक कामगिरीमध्ये म्हणावा तसा काहीच फरक पडलेला दिसून येत नाही. कर्णधार आणि हुकमी खेळाडू लोकेश राहुल याच्यावरच पंजाब संघ सर्वाधिक अवलंबून असल्याचे दिसून आले. ज्या ज्या सामन्यात राहुल अपयशी ठरला, त्या त्या सामन्यात पंजाबची फलंदाजी कोलमडल्याचे दिसून आले. शिवाय गोलंदाजीमध्येही पंजाबकडून फारसा प्रभावी ठरला नाही. यंदा पंजाबने तब्बल २२ कोटी खर्च करुन दोन वेगवान गोलंदाज आपल्या ताफ्यात घेतले. मात्र, हे मैदानावरही तितकेच महागडे ठरत असल्याचे दिसल्याने पंजाबच्या चिंतेत भर पडली आहे.

IPL 2021: भारतात कोरोनाचा विस्फोट! न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी घेतला महत्वाचा निर्णय

यंदाच्या लिलाव प्रक्रियेत पंजाब संघाने अनेक खेळाडूंची निवड केली. यामध्ये न्यूझीलंडचा राइली मेरेडिथ आणि ऑस्ट्रेलियाचा झाय रिचर्डसन यांना अनुक्रमे ८ कोटी आणि १४ कोटी रुपयांची किंमत देत पंजाबने आपल्या ताफ्यात घेतले. म्हणजे केवळ या दोघांसाठीच पंजाबने २२ कोटी खर्च केले. त्यामुळे सहाजिकच या दोघांकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण सध्या होतेय ते भलतेच.

३७ चेंडूत ठोकलेलं शतक, विराट कोहली या विस्फोटक फलंदाजाला का खेळवत नाही?

हे दोन्ही गोलंदाज पंजाबसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहेत. पंजाबने सुरुवातीच्या तीन सामन्यांत राइली याला अंतिम संघात स्थान दिले. मात्र, प्रतिस्पर्धी संघांनी त्याला जबरदस्त चोपले. तीन सामन्यांत त्याला केवळ २ बळी घेता आले. तब्बल ५२.५०च्या सरासरीने त्याने धावांची खैरात केली. दुसरीकडे, रिचडर््सनलाही कमी चोप बसला नाही. त्यानेही ३ सामन्यांतून ३९च्या सरासरीने धावा दिल्या. दोघांचा इकोनॉमी रेट १० हून अधिक राहिला हे विशेष. रिचर्डसनने आतापर्यंत केवळ ३ बळी घेतले आहेत.

IPL 2021: मोदी बेजबाबदार! IPL थांबवा अन् कोरोनाकडे लक्ष द्या, ब्रिटनच्या पत्रकाराची रोखठोक टीका

पंजाबसाठी गोलंदाजी कायम कमजोर बाजू राहिली आहे. त्यामुळेच बिग बॅशमध्ये चमकलेल्या या दोन गोलंदाजांवर पंजाबने विश्वास दाखवला. मात्र, भारतातल्या संथ आणि सपाट खेळपट्ट्यांवर या दोघांची धुलाई होताना दिसत आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे यंदाच्या बिग बॅशमध्ये सर्वाधिक बळी रिचर्डसनने घेतल्या होत्या. मात्र, त्याचा हा सर्व जोश आयपीएलमध्ये उतरला आहे. बिग बॅशमध्ये रिचर्डसनने १७ सामन्यांतून २९, तर राइलीने १३ सामन्यांतून १६ बळी घेतले होते. मात्र, दोघांना आयपीएलमध्ये अद्याप लय सापडलेली नाही.

Web Title: IPL 2021 Two Punjab bowlers worth Rs 22 crore are too expensive on the field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.