Join us  

IPL 2021, Umran Malik : उम्रान मलिक, भारताचा नवीन स्पीड स्टार; फेकला सर्वात वेगवान चेंडू, विराटचेही डोळे विस्फारले!

IPL 2021: Umran Malik has bowled the fastest ball of IPL 2021 : भारतीय क्रिकेटला नवीन स्पीडस्टार मिळाला, असा दावा केला गेल्यास आश्चर्य वाटू देऊ नका.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 10:54 PM

Open in App

IPL 2021: Umran Malik has bowled the fastest ball of IPL 2021 : भारतीय क्रिकेटला नवीन स्पीडस्टार मिळाला, असा दावा केला गेल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाचे आयपीएल २०२१मधील आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांनी जाताजाता भारताला एक दमदार गोलंदाज दिला... टी नटराजन याला कोरोना झाला अन् SRHनं बदली खेळाडू म्हणून जम्मू काश्मीरच्या उम्रान मलिकला ( Umran Malik) संघात घेतले. नेट बॉलर असलेल्या मलिकनं आजच्या सामन्यात आयपीएल २०२१मधील सर्वात वेगवान चेंडू फेकला अन् RCBचा कर्णधार विराट कोहलीही पाहत राहिला.

२१ वर्षीय गोलंदाजानं आजच्या सामन्यात 153kmph च्या वेगानं चेंडू टाकून हा विक्रम नोंदवला. कोलकाता नाइट रायडर्सच्या ल्युकी फर्ग्युसननं १५२.७४च्या वेगानं चेंडू फेकला होता. तो विक्रम आज मलिकनं मोडला. आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यात मलिकनं १५१.०३ kmph च्या वेगानं चेंडू टाकून सर्वांचे लक्ष वेधले होते. 

आयपीएल २०२१त भारतीय गोलंदाजानं टाकलेल्या सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम नावावर केला. याआधी हा विक्रम मोहम्मद सिराजच्या नावावर होता आणि त्यानं १४७.६८ kmph वेगानं चेंडू टाकला होता. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान टाकण्याचा विक्रम अॅनरिच नॉर्ट्जेच्या नावावर आहे. त्यानं याच पर्वात १५६.२२ kmphच्या वेगानं चेंडू फेकला. त्यानं डेल स्टेनचा १५४.४० kmph चा विक्रम मोडला. उम्रान मलिक जम्मू-काश्मीरसाठी १ लिस्ट ए व १ ट्वेंटी-२० सामना खेळला आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद
Open in App