Join us  

IPL 2021: कोहलीचं 'बॅड लक'! आज होणार होते ऐतिहासिक द्विशतक; आता करावी लागेल प्रतीक्षा

IPL 2021: केकेआर विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा सामनाच रद्द करुन पुढे ढकलण्यात आला. हा सामना एका गोष्टीने ऐतिहासिक ठरणार होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 3:36 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ज्याची भिती होती, तेच झाले. कोलकाता नाईट रायडर्स संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यातच काही खेळाडूंची तब्येतही बिघडल्याचे कळाले. यानंतर सोमवारी होणारा केकेआर विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हा सामनाच रद्द करुन पुढे ढकलण्यात आला. हा सामना एका गोष्टीने ऐतिहासिक ठरणार होता. या सामन्याद्वारे आरसीबीचा कर्णधार विराट कोहली अनोखे द्विशतक ठोकणार होता, मात्र आता त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

IPL 2021: कोरोनानं 'बायो-बबल' कसं भेदलं? कारण कळालं, सर्वच झाले हैराण!

कोहली आरसीबीकडून अनोखे द्विशतक झळकावण्यास सज्ज झाला होता. विशेष म्हणजे असे द्विशतक पूर्ण करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरणार होता. कोहली आरसीबीकडून २००वा आयपीएल सामना खेळणार होता. याआधीही अनेक खेळाडूंनी २०० आयपीएल सामने पूर्ण केले आहेत, मात्र ते वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्त्व करताना. कोहली मात्र, एकाच संघाकडून २०० आयपीएल सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरणार होता. त्यामुळेच हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार होता. मात्र, कोरोनामुळे केकेआरविरुद्धचा सामना पुढे ढकलण्यात आल्यानंतर कोहलीला या विक्रमासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.

IPL 2021: कोरोनानं IPLचं बायो-बबल भेदलं! KKR स्पर्धेतून 'आऊट' की आयपीएल स्पर्धाच रद्द?, BCCI पेचात

याआधी, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि सुरेश रैना यांनी २०० आयपीएल सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे. मात्र, या सर्वांनी हे सामने एकाहून अधिक संघाकडून खेळताना खेळले. त्यामुळेच कोहलीची कामगिरी या सर्वांहून वेगळी ठरणार होती.

कोहलीने आरसीबीकडून आतापर्यंत १९९ सामने खेळले असून त्याने १९१ डावांमध्ये ३१ वेळा नाबाद राहत सर्वाधिक ६०७६ धावा काढल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढण्याºयांमध्ये तो आघाडीवर आहे. यादरम्यान त्याने ५ शतके आणि ४० अर्धशतके झळकावली आहेत. ११३ धावांची खेळी त्याची सर्वोत्तम असून कोहलीने एकूण ५२४ चौकार आणि २०५ षटकारही ठोकले आहेत. 

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर