IPL 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा ( RCB ) कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याची चायनीझ कंपनी VIVO च्या सदिच्छादूत म्हणून निवड करण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवरील हल्ल्यानंतर चायनीझ कंपनीवर बंदीची मागणी जोर धरू लागली होती. भारतीयांच्या भावनांचा आदर करताना गतवर्षी Vivoनं आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपवरून माघार घेतली होती. Dream 11 या कंपनीनं आयपीएल २०२०च्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते, परंतु यंदा पुन्हा VIVOच टायटल स्पॉन्सर असणार असल्याचे बीसीसीआयनं आधीच जाहीर केले आहे. त्यात आला VIVOनं विराट कोहलीला करारबद्ध केलं आहे. चेन्नईतही मुंबई इंडियन्सचा शाही थाट; MI महालाची सफर करून तुम्ही म्हणाल क्या बात, क्या बात...!
Vivo Indiaचे संचालक निपूण मार्या यांनी सांगितले की,''विराट कोहलीशी करार करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यात आता विराटशी करार झाल्यानंतर आणखी युवा ग्राहक आकर्षित होतील." विराट कोहली म्हणाला,'' VIVO सोबत काम करण्यासाठी मीही आतुर आहे. खेळाडू म्हणून सातत्य आणि समर्पण याचे महत्त्व मला चांगले माहित आहे. भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये VIVO अग्रणीचा ब्रँड आहे.'' RCBच्या अडचणीत आणखी भर, देवदत्त पडिक्कलनंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
Vivo India ने २०१७मध्ये २१९९ कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. VIVOनं प्रती वर्ष ४४० कोटी यानुसार पाच वर्षांकरीता आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते. भारत-चीन सीमेवर झालेल्या हाणामारीनंतर चायनीझ कंपन्यांवर बहिष्काराची मागणी वाढली. त्यामुळे २०२०च्या टायटल स्पॉन्सरशीपमधून VIVOनं माघार घेतली. Dream 11नं २२२ कोटींमध्ये २०२०चं टायटल स्पॉन्सरशीप मिळवली.RCBचा फलंदाज फुल्ल फॉर्मात; ४९ चेंडूंत कुटल्या १०४ धावा, विराट कोहलीच्या संघाची मधली फळी मजबूत होणार