Join us  

IPL 2021, Virat Kohli : आता बिनधास्त भिडणार, टॉप टूमध्ये जागा पटकावणार; प्ले ऑफमध्ये एन्ट्री घेताच विराट कोहलीची गर्जना

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं रविवारी पंजाब किंग्सवर ( Punjab Kings) ६ धावांनी विजय मिळवताना प्ले ऑफमधील स्थान पक्के केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 8:52 PM

Open in App

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( Royal Challengers Banglore) संघानं रविवारी पंजाब किंग्सवर ( Punjab Kings) ६ धावांनी विजय मिळवताना प्ले ऑफमधील स्थान पक्के केले. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि RCB यांनी प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली बंगलोरनं सलग दुसऱ्या वर्षी प्ले ऑफमध्ये एन्ट्री मारली. या विजयानंतर विराटनं भीमगर्जना केली की आता बिनधास्त खेळणार आणि टॉप टूमध्ये स्थान पटकावणार. देवदत्त पडिक्कल ( ४०) व ग्लेन मॅक्सवेल ( ५७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं ७ बाद १६४ धावा केल्या. मोहम्मद शमी व मोईजेस हेन्रीक्स यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्सच्या लोकेश राहुल ( ३९) व मयांक अग्रवाल ( ५७) या जोडीनं दमदार सुरुवात करून दिली. मात्र, युझवेंद्र चहलनं एकाच षटकात दोन धक्के देत सामना फिरवला. चहलनं २९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. एडन मार्करामनं २०, शाहरुख खाननं १६ धावा करताना पंजाबसाठी संघर्ष केला. परंतु त्यांना ६ बाद १५८ धावांपर्यंतच मजल मारता आली.

RCBनं १२ सामन्यांत ८ विजय मिळवून १६ गुणांची कमाई केली आहे आणि त्यांचे आणखी चार सामने शिल्लक आहेत. या सामन्यानंतर विराट म्हणाला, खूप आनंदी वाटतंय. २०११नंतर आम्हाला अशी कामगिरी करता आली नव्हती. १२ सामन्यांत ८ विजय मिळवून आम्ही प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. आणखी दोन विजय आणि आम्ही टॉप टूमध्ये प्रवेश करू. आता तर आणखी बिनधास्त खेळ करण्याची प्रेरणा मिळाली आहे.''      

टॅग्स :आयपीएल २०२१रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीपंजाब किंग्स
Open in App