IPL 2021 : वीरेंद्र सेहवागचा RCBला सल्ला; विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, ओपनिंगसाठी युवा खेळाडूचं सूचवलं नाव

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  (RCB) संघाने ७ पैकी ५ सामने जिंकून कमाल केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 02:52 PM2021-05-02T14:52:12+5:302021-05-02T14:52:31+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 : Virat kohli Should Bat At no 3 Mohammed Azharuddeen Should Open, Virendra Sehwag Advice RCB  | IPL 2021 : वीरेंद्र सेहवागचा RCBला सल्ला; विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, ओपनिंगसाठी युवा खेळाडूचं सूचवलं नाव

IPL 2021 : वीरेंद्र सेहवागचा RCBला सल्ला; विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवा, ओपनिंगसाठी युवा खेळाडूचं सूचवलं नाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखालील खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  (RCB) संघाने ७ पैकी ५ सामने जिंकून कमाल केली आहे. त्यांची सलग चार सामन्यांची विजयी मालिका चेन्नई सुपर किंग्सनं खंडीत केली आणि त्यानंतर त्यांना पंजाब किंग्सकडूनही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे RCBवर पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं RCBला सल्ला दिला आहे.  

विराट कोहलीनं सलामीला न येता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा सल्ला वीरूनं दिला. तो म्हणाला,''RCBनं सलामीला मोहम्मद अझरुद्दीनला पाठवायला हवं. विराटनं त्याच्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावं. रजत पाटिदार याला चांगली कामगिरी करण्यात अपयश येत आहे आणि त्याच्याजागी अझरुद्दीनला संधी मिळायला हवी. तो एक चांगला पर्याय आहे. कोहलीनंतर ग्लेन मॅक्सवेल व एबी डिव्हिलियर्स ही जोडी आहेच.''  CSKची निर्दयपणे धुलाई करणारा पहाडाएवढा किरॉन पोलार्ड झाला भावूक; दिवंगत वडिलांच्या आठवणीत आभाळाकडे हात जोडून पाहत राहिला

''देवदत्त पडीक्कल व अझरुद्दीन ही सलामीची जोडी अपयशी ठरली तरी RCBचा डाव सावरण्यासाठी विराट, मॅक्सवेल व डिव्हिलियर्स हे त्रिकुट आहेच,'' असेही वीरू म्हणाला. विराट कोहलीनं ७ सामन्यांत १९८ धावा केल्या आहेत. त्यात नाबाद ७२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे. रजत पाटीदारला ४ सामन्यांत ७१ धावा करता आल्या आहेत. 

कोण आहे मोहम्मद अझरुद्दीन ?
केरळचे प्रतिनिधत्व करणारा २६ वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज अझहरुद्दीनने अलीकडेच सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत एक आक्रमक खेळी केली होती. अझरुद्दीनच्या १३७ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर केरळ संघाने २१४ धावा केल्या होत्या.  या स्पर्धेत त्याने १७ चौकार व १५ षटकार लगावले. मुंबईविरुद्ध केवळ ३७ चेंडूंमध्ये त्याने शतक ठोकत क्रिकेट वर्तुळाला पुन्हा एकदा दखल घेण्यास भाग पाडले.

मोठ्या भावाने ठेवले नाव
अझहरुद्दीनचा जन्म २२ मार्च १९९४ रोजी केरळच्या थालांगारामध्ये झाला. त्याचे हे नवा त्याच्या मोठ्या भावाने ठेवले. त्याचा मोठा भाऊ माजी कर्णधार अझरुद्दीनचा फॅन होता. त्यामुळेच त्याने आपल्या लहान भावाचे नाव मोहम्मद अझरुद्दीन ठेवले. त्याचे आई-वडील त्याचे नाव वेगळे ठेवण्याच्या विचारात होते. मोठ्या भावाला आशा होती की, त्याचा भाऊ कर्णधार अझहरप्रमाणे आक्रमक फलंदाजी करेल. योगायोग असा की, मोठ्या भावाची आशा २६ वर्षांनंतर सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये लहान भावाने सार्थ ठरविली.
 

Web Title: IPL 2021 : Virat kohli Should Bat At no 3 Mohammed Azharuddeen Should Open, Virendra Sehwag Advice RCB 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.