IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती

रविवारपासून IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामन्यांना झाली सुरूवात. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 03:28 PM2021-09-21T15:28:05+5:302021-09-21T15:30:25+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2021 virender sehwag lauds msd captaincy against mi says ms dhoni has sharp brain | IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती

IPL 2021: सगळ्यात 'तेज दिमाग'चा धनी, महेंद्रसिंह धोनी; वीरूकडून 'कॅप्टन कूल'ची धो-धो स्तुती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरविवारपासून IPL च्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामन्यांना झाली सुरूवात.पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता.

रविवारपासून IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांना संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनंमुंबई इंडियन्सचा पराभव केला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) याच्या रणनितीची अनेकांनी स्तुती केली. मुंबई इंडियन्सची टीम रोहित शर्माशिवायच (Rohit Sharma) मैदानावर उतरली होती. नाणेफेक जिंकल्यानंतर चेन्नईनं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सनं पॉवर प्लेमध्ये ४ विकेट्स गमावत केवळ २४ धावा केल्या होत्या. परंतु यानंतर ऋतुराज गायकवाडनं उत्तम फलंदाजी करत ५८ चेंडूत ८८ धावा केल्या आणि मुंबईच्या संघाला १५७ धावांचं लक्ष्य दिलं.

आपल्या रणनितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या महेंद्र सिंग धोनी यानं गोलंदाजांना अशाप्रकारे सोटेट केलं की मुंबई इंडियन्सना २० धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर गुणतालिकेत चेन्नईचा संघ अव्वल स्थानी पोहोचला. दरम्यान, यानंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग यांनं धोनीच्या या रणनितीची आणि घेतलेल्या निर्णयांची स्तुती केली. संपूर्ण स्पर्धेत सीएसकेच्या कर्णधारातं डोकं सर्वात जलद चालत असल्याची प्रतिक्रिया सेहवागनं क्रिकबझशी बोलताना दिली. 

"धोनीचं नेतृत्व स्तुती करण्यासारखंच आहे. यात कोणतंही दुमत नाही. तो सामन्यापूर्वी रणनिती आखत नाही. तो मैदानावरील परिस्थितीचा अंदाज घेतो आणि त्या प्रमाणे तो समोरच्या संघावर आक्रमण करतो. जर कोणताही फलंदाज जर जलद गतीच्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर सहज खेळत असेल तेव्ह तो त्वरित फिरकी गोलंदाजाला आणतो," असं सेहवाग म्हणाला. 

"जेव्हा त्यानं ब्रावोसाठी फिल्डिंग सेट केली हे एक उत्तम उदाहरण आहे. चार फिल्डर्स सिंगल्स रोखण्यासाठी आणि विकेट मिळवण्यासाठी सर्कलच्या आत होते. त्याच वेळी त्याला ईशान किशनची विकेट मिळाली. तो एक उत्तम कर्णधार आहे. त्यांचे गोलंदाज फिल्डिंग नुसार गोलंदाजी करतात. या स्पर्धेमधज्ये जर कोणाकडे सर्वात जलद चालणारं डोकं असेल तर तो धोनी आहे," असंही त्यांनं स्पष्ट केलं. 

... हा टर्निंग पॉईंट होता
"माझ्यासाठी टर्निंग पॉईंट पोलार्डच्या समोर जोश हेजलवुडला आणणं हा होता. त्याच्यासमोर जर स्पिनरला आणलं तर पोलार्ड त्याचा सामना करू शकेल याची त्याला कल्पना होती. यासाठीच मला वाटतं की इथूनच सामना पलटला," असं सेहवागनं सांगितलं.

 

Web Title: ipl 2021 virender sehwag lauds msd captaincy against mi says ms dhoni has sharp brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.