Join us  

IPL 2021: SRH मध्ये गोलमाल! एका खेळाडूवरुन मॅनेजमेंटमध्ये फूट; लक्ष्मण आणि मूडीमध्ये कोण खरं, कोण खोटं?

IPL 2021: सनरायझर्स हैदराबादच्या संघात सारंकाही गोलमाल सुरूय असं दिसून येत आहे. कारण संघाच्या व्यवस्थापनामध्येच एक वाक्यता दिसून आलेली नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 12:31 PM

Open in App

IPL 2021: सनरायझर्स हैदराबाद संघानं शनिवारचा मुंबई इंडियन्स विरुद्धचा हातचा सामना गमावला. सामन्यात मुंबई इंडियन्सला १५० धावांवर रोखल्यानंतर प्रत्युत्तरात हैदराबादची सुरुवात देखील दणक्यात झाली होती. सामन्यावर पूर्णपणे सनरायझर्सनं पकड निर्माण केली होती. पण अखेरच्या षटकांमध्ये सामना पलटला आणि सनरायझर्सचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले आणि संपूर्ण संघ १३८ धावांत गारद झाला. सनरायझर्सनं यंदाच्या सीझनमध्ये पहिले तिनही सामना गमावले आहेत. 

On This Day: एका वादळी खेळीनं झाली होती IPL ची सुरुवात; ७३ चेंडूत मॅक्युलमनं ठोकलेल्या १५८ धावा!

यंदाच्या सीझनमध्ये हैदराबाद हा एकच असा संघ आहे की ज्यांचं वियजाचं खातं अद्याप उघडू शकलेलं नाही. सनरायझर्स हैदराबादच्या संघात सारंकाही गोलमाल सुरूय असं दिसून येत आहे. कारण संघाच्या व्यवस्थापनामध्येच एक वाक्यता दिसून आलेली नाही. (ipl 2021 vvs laxman and tom moody dispute over t natarajan not playing in mi vs srh match)

टी.नटराजनबाबत व्यवस्थापनाची दोन मतंसनरायझर्स हैदराबादमध्ये दोन वेगवेगळी मतं आहेत याचा खुलासा टी.नटराजनला कालच्या सामन्यात न खेळवल्याच्या मुद्द्यावरुन झाला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात हैदराबादनं काल चार बदल केले होते. यात टी-२० स्पेशलिस्ट टी.नटराजन याला हैदराबादनं संघाबाहेर ठेवलं होतं. याबाबत संघ व्यवस्थापनाला विचारण्यात आलं असता एकमत दिसून आलं नाही. संघाचे मार्गदर्शक व्हीव्हीएस लक्ष्मणनं टी.नटराजनबाबत एक मत व्यक्त केलं तर संघाचे मुख्य प्रशिक्षक टॉम मुडी यांनी वेगळंच कारण दिलं. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की आता खरं कोण आणि खोटं कोण?

नाद करायचा न्हाय! 'ऑल आउट' करण्यात मुंबई इंडियन्स 'ऑल अहेड'

टी.नटराजनला न खेळविण्याबाबत लक्ष्मणनं दुखापतीचं कारण दिलं. "टी.नटराजन सध्या फिट नाही. त्याच्या गुडख्याला सूज आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात तो खेळत नाहीय", असं व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सांगितलं. पण हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक टॉम मूडी यांनी वेगळंच कारण सांगितलं. टॉम मूडी यांच्या मतानुसार टी.नटराजनबाबत वर्क लोड मॅनेजमेंटचा विचार करुन त्याला आराम देण्यात आला होता. "टी.नटराजन संघाचा महात्वाचा खेळाडू आहे. वर्क लोड मॅनेजमेंटच्या इराद्यानं त्याला मुंबई विरुद्धच्या सामन्यासाठी संघात समाविष्ट केलेलं नाही", असं टॉम मूडी म्हणाले. त्यामुळे टी.नटराजनला संघाबाहेर ठेवण्याच्या मुद्द्यावर नेमकं कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय हे कळायला मार्ग नाही. 

सनरायझर्स हैदराबादनं सामना गमावला अन् काव्या मारनच्या अश्रूंचा बांध फुटला, See Photo

संघाच्या व्यवस्थापनातील दोन मोठ्या आणि महत्वाच्या व्यक्तींच्या मतांमध्ये विरोधाभास आढळल्यानंच संघात गोलमाल असल्याचं बोललं जात आहे. टी.नटराजनसारख्या अनुभवी आणि उपयुक्त गोलंदाजाला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर ठेवण्याचं नेमकं कारण काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.  

टॅग्स :सनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२१टी नटराजन