Join us  

IPL 2021 : स्थानिक स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करायचीय - देवदत्त पडिक्कल

Devdutt Padikkal : आरसीबीच्या ट्विटर हॅन्डलवर तो म्हणाला,‘कोरोना हा धक्का होता. काही गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. पुनरागमनानंतर फिट राखण्यावर भर देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 6:55 AM

Open in App

चेन्नई : कोरोना संक्रमणातून सावरलेला आरसीबीचा सलामीचा युवा फलंदाज देवदत्त पडिक्कल आयपीएलसाठी सज्ज आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये अलीकडे त्याने धावांचा पाऊस पाडला होता. आयपीएलमध्येही या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.पडिक्कल २२ मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तेव्हापासून तो विलगीकरणात होता. आता पूर्णपणे फिट होऊन सराव करीत आहे. स्वत:ला फिट राखण्यासाठी तो घाम गाळत आहे.आरसीबीच्या ट्विटर हॅन्डलवर तो म्हणाला,‘कोरोना हा धक्का होता. काही गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. पुनरागमनानंतर फिट राखण्यावर भर देत आहे. आयपीएलसाठी १०० टक्के तंदुरुस्ती आवश्यक आहे. असे नसेल तर कामगिरी होणार नाही. मागच्या सत्रात २० वर्षांच्या देवदत्तने आरसीबीसाठी सर्वाधिक ४७३ धावा केल्या. त्यात पाच अर्धशतकांचा समावेश होतता. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली करंडकात सहा सामन्यांत २,२१८ आणि विजय हजारे करंडक स्पर्धेच्या सात सामन्यांत ७३७ धावा ठोकल्या. मागचे आयपीएल माझ्यासाठी अविस्मरणीय ठरले. त्यानंतर स्थानिक मोसमातही मी धावा काढल्या. हा आत्मविश्वास कायम राहील, असा विश्वास आहे.’

टॅग्स :देवदत्त पडिक्कलआयपीएल २०२१