Join us  

IPL 2021: मॅक्सवेल ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर कोहलीचं नाटक जिंकलं; RCB ची 'ऑफ द फिल्ड' धमाल पाहा...

IPL 2021, RCB: खेळाडूंचा एकांतवास घालविण्यासाठी आणि संघातील समन्वय वाढविण्यासाठी प्रत्येक संघाकडून विविध मनोरंजक टास्कचं आयोजन केलं जातं. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 2:56 PM

Open in App

IPL 2021: आयपीएलच्या रणांगणात अखेरच्या चेंडूपर्यंत खेळाडूंची कसोटी आणि थरार अनुभवयाला मिळतो. अखेरीस उत्तम सांघिक कामगिरी करणाऱ्या संघाचा विजय होतो. पण सांघिक कामगिरी उत्तम होण्यासाठी संघातील खेळाडूंमधील संवाद आणि खेळीमेळीचं वातावरण देखील असायला हवं. आयपीएलमध्ये सध्या सर्वच संघ बायो बबलच्या नियमांचं पालन करुन खेळत आहेत. त्यामुळे खेळाडूंचा एकांतवास घालविण्यासाठी आणि संघातील समन्वय वाढविण्यासाठी प्रत्येक संघाकडून विविध मनोरंजक टास्कचं आयोजन केलं जातं. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या व्यवस्थापनानं देखील असाच एक टास्क संघातील खेळाडूंना दिला होता. खेळाडूंमधील इतर कलागुणांना वाव देण्यासाठी आणि खेळाडूंना सामन्याच्या दबावातून मुक्त करण्यासाठी मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले होते. यात बंगळुरूच्या व्यवस्थापनानं यंदा छोटेखानी नाटक स्पर्धेचं आयोजन केलं होतं. याचा एक धमाल व्हिडिओ सद्या तुफान व्हायरल होतोय आणि सोशल मीडियात याची जोरदार चर्चा देखील सुरू आहे. 

बंगळुरूच्या संघातील खेळाडूंच्या एकूण तीन टीम्स यावेळी तयार करण्यात आल्या होत्या आणि प्रत्येकाला एक नाटक सादर करायचं होतं. नाटकाची स्क्रिप्ट, डायलॉग आणि इतर गोष्टी सर्व आवश्यक गोष्टी खेळाडूंना देण्यात आल्या होत्या. अर्थात विनोदी नाटकांचा यात समावेश करण्यात आला होता. या संपूर्ण स्पर्धेत विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, वाशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल यांच्यासह इतर सर्व खेळाडूंनी भरपूर धमाल केली. 

यजुवेंद्र चहल, विराट कोहली आणि एबी डिलिव्हिलियर्स या तिघांच्या नेतृत्वात तीन वेगवेगळी नाटकं यावेळी सादर करण्यात आली. ती पाहण्यासाठी खेळाडूंच्या पत्नी आणि इतर मंडळी उपस्थित होती. तसंच तीन परीक्षक देखील नेमण्यात आले होते. 

तिनही नाटकं अतिशय धमाल झाली आणि अखेरीस परीक्षकांनी देखील निकाल जाहीर केला. यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याला सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीमनं सादर केलेलं नाटक सर्वोत्कृष्ट नाटक ठरलं.  

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२१विराट कोहलीएबी डिव्हिलियर्सग्लेन मॅक्सवेल