IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) बुधवारी आयपीएल २०२१त सनरायझर्स हैदराबादवर ( Sunrisers Hyderabad) ७ विकेट्स व ९ चेंडू राखून सहज विजय मिळवला. SRHचे ३ बाद १७१ धावांचा CSKनं १८.३ षटकांत यशस्वी पाठलाग केला. या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) विजयाचे श्रेय अंतिम ११ खेळाडूंव्यतिरिक्त बाकावर बसलेल्या प्रत्येक खेळाडूला दिलं. IPL 2021 : CSK Vs SRH T20 Live Score Update फुटबॉलच्या मैदानावर सुरू झाली KKRच्या नितीश राणाची लव्ह स्टोरी, वयाने मोठी आहे पत्नी!
मॅचचे हायलाईट्स ( Video) कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मनीष पांडे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ चेंडूंत १०६ धावांची भागीदारी केली. आयपीएलमध्ये वॉर्रननं ५५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा केल्या. मनीष ४६ चेंडूंत ६१ धावा ( ५ चौकार व १ षटकार) करून बाद झाला. शार्दूल ठाकूरनं टाकलेल्या १९व्या षटकात केन विलियम्सननं २० धावा चोपल्या. अखेरच्या षटकात १३ धावा आल्या. केन १० चेंडूंत २६ आणि केदार जाधव ४ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. CSK Vs SRH Live Score, IPL 2021 CSK Vs SRH, CSK Vs SRH Live Match KKRचा आंद्रे रसेल पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार; बऱ्याच स्टार परदेशी खेळाडूंचा सहभाग
प्रत्युत्तरात फॅफ ड्यू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांनी हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे उपटली. ऋतुराजनं ४४ चेंडूंत १२ चौकारांसह ७५ धावा केल्या. आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. फॅफनं ३८ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५६ धावा केल्या. रवींद्र जडेजा व सुरेश रैना यांनी CSKचा विजय पक्का केला. हैदराबादकडून राशिद खाननं ३६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. CSKनं ७ विकेट्स राखून हा सामना जिंकून प्ले ऑफच्या दिशेनं मजबूत पाऊल टाकले आहे. चेन्नईनं १८.३ षटकांत विजयी लक्ष्य पार केले. कडक सॅल्युट!; इरफान व युसूफ पठाण कोरोना रुग्णांना पुरवतायत मोफत अन्न; ट्विट केला हेल्पलाईन नंबर
महेंद्रसिंग धोनी काय म्हणाला?''फलंदाजांची कामगिरी दमदार होती, परंतु याचा अर्थ असा नाही की गोलंदाजांनी निराश केलं. दिल्लीची खेळपट्टी आश्चर्यकारक ठरली, येथे दवही नव्हते. सलामीवीरांच्या कामगिरीचे विशेष कौतुक.. समस्यांचा पाढा वाचण्यापूर्वी त्यावरील उपाय शोधणं गरजेचं असतं, तेच योग्य असतं. ५-६ महिने आम्ही क्रिकेटपासून दूर होतो आणि मागील पर्वही आमच्यासाठी खडतर गेलं. दीर्घ क्वारंटाईन आणि असे अनेक प्रश्न आहेत. यापैकी मी काही सोडवण्याचा प्रयत्न केला, तर यावर्षी खेळाडूंनी जास्त जबाबदारी स्वीकारली आहे,''असे धोनी सामन्यानंतर म्हणाला. IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर राजस्थान रॉयल्सकडून खेळणार; अजिंक्य रहाणेही RRमध्ये परतणार?
तो पुढे म्हणाला,''मागील ८-१० वर्षांत आम्ही संघात फार बदल केलेले नाहीत. ज्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यांचेही कौतुक करायला हवं. स्वतःवर विश्वास ठेवा आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल, त्यासाठी सज्ज राहा. हे खेळाडू ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगलं ठेवतात. त्यामुळेच ज्यांना संधी मिळालेली नाही, अशा खेळाडूंना अधिकचं श्रेय द्यायला हवं.''