IPL 2021: सलग ९ व्या वर्षी मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव; रोहित शर्मानं दिली खणखणीत प्रतिक्रिया, म्हणाला...

IPL 2021, Mumbai Indians: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाला २०१३ सालापासून आयपीएलमधील पहिल्या सामन्यात विजय प्राप्त करता आलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 02:01 PM2021-04-10T14:01:39+5:302021-04-10T14:04:49+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021 Winning championship is important not the 1st game says Rohit Sharma as MI fail to break 8 year old jinx | IPL 2021: सलग ९ व्या वर्षी मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव; रोहित शर्मानं दिली खणखणीत प्रतिक्रिया, म्हणाला...

IPL 2021: सलग ९ व्या वर्षी मुंबईचा पहिल्या सामन्यात पराभव; रोहित शर्मानं दिली खणखणीत प्रतिक्रिया, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Mumbai Indians: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाला २०१३ सालापासून आयपीएलमधील पहिल्या सामन्यात विजय प्राप्त करता आलेला नाही. गेल्या ९ वर्षांपासून आयपीएल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पदरात निराशा पडत आहे. शुक्रवारी चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळरू (RCB) विरुद्धच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. कोहली ब्रिगेडनं मुंबई इंडियन्सवर दोन विकेट्सनं विजय प्राप्त करुन यंदाच्या सीझनची चांगली सुरुवात केली. 

Match Prediction: धोनीचा धुमधडाका, दिल्लीला बसू शकतो मोठा फटका?  

मुंबई इंडियन्सची सलामीचा सामना गमावण्याची मालिका जरी गेल्या ९ वर्षांपासून सुरु असली तरी याच काळात संघानं ४ वेळा स्पर्धेचं जेतेपद देखील पटकावलं आहे. तर एकूण पाचवेळा जेतेपद पटकावणारा सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सची ओळख आहे. 

धोनी विरुद्धच्या सामन्यापूर्वी रिकी पाँटिंगचं सुरेश रैनाबाबत मोठं विधान, म्हणाला...

बंगळुरू विरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माला गेल्या ९ सीझनपासून पहिल्या सामन्यात होणाऱ्या पराभवाबाबत विचारलं असता त्यानं खणखणीत उत्तर दिलं. "स्पर्धेचा पहिला सामना जिंकण्यापेक्षा मला वाटतं स्पर्धेचं जेतेपद जिंकणं जास्त महत्वाचं आहे", असं रोखठोक उत्तर देत रोहितनं आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. 

जेव्हा रोहित शर्माने काढल्या होत्या ५ चेंडूत मुंबई इंडियन्सच्या ४ विकेट!, असं कसं घडलं? 

"जबरदस्त लढत झाली. स्कोअरबोर्डवर अपेक्षित धावसंख्या आम्ही उभारू शकलो नसतानाही आम्ही प्रतिस्पर्ध्यांना सहजासहजी जिंकू दिलं नाही. आमच्याकडून स्कोअरबोर्डवर किमान २० धावा कमीच झाल्या होत्या. काही चुका आमच्याकडून झाल्या आणि त्या होत असतात. यातून पुढे जायला हवं", असंही रोहित म्हणाला. 

हर्षल पटेलच्या गोलंदाजीसमोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून एका सामन्याच पाच विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला, पण मुंबई इंडियन्सविरुद्ध अशी कामगिरी कोणालाच जमली नव्हती. आरसीबीच्या गोलंदाजापाठोपाठ फलंदाजीत विराट कोहलीनं ( Virat Kohli) कमाल केली. ग्लेन मॅक्सवेलनंही सुरेख खेळ करताना फॉर्मात परतल्याचा ट्रेलर दाखवला. एबी डिव्हिलियर्स मॅच फिनिशर ठरला आणि त्याच्या तुफान फटकेबाजीनं RCBला विजय मिळवून दिला.

मुंबई इंडियन्सनं २०१२मध्ये आयपीएल पर्वातील पहिला सामना जिंकला होता
२०१३ - पराभूत वि. बंगलोर
२०१४ - पराभूत वि. कोलकाता
२०१५ - पराभूत वि. कोलकाता
२०१६ - पराभूत वि. पुणे
२०१७ - पराभूत वि. पुणे
२०१८ - पराभूत वि. चेन्नई
२०१९ - पराभूत वि. दिल्ली
२०२० - पराभूत वि. चेन्नई 
 

Web Title: IPL 2021 Winning championship is important not the 1st game says Rohit Sharma as MI fail to break 8 year old jinx

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.