- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयपीएल म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस. येथे गोलंदाजांना प्रचंड मेहनत करावी लागते. मात्र त्याचवेळी, कधी कधी भाव खाऊन जातात ते फिल्डर्स. मोक्याच्यावेळी अडवलेले धावा किंवा पकडलेला एक निर्णायक झेल संपूर्ण सामना फिरवण्यास कारणीभूत ठरतो. यंदाच्या आयपीएलमध्येही असे अनेक शानदार क्षेत्ररक्षण पाहण्यास मिळाले. असे असले, तरी अनेक सुटलेले झेलही पाहण्यास मिळाले. गतविजेत्या मुंबई इंडियन्सपासून ते तळाला राहिलेल्या राजस्थान रॉयल्सपर्यंत सर्वच संघांनी यावेळी सुमार क्षेत्ररक्षण करत अनेक झेल सोडले. मात्र एक असा संघ ठरला आहे, ज्याने आतापर्यंत एकही झेल सोडलेला नाही. तो संघ म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यावर एका सामन्याच्या बंदीची टांगती तलवार, पंजाबविरुद्ध चुकल्यास माफी नाही मिळणार!
हैदराबाद संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना एकही झेल सोडण्याची कामगिरी केलेली नाही. यंदाच्या सत्रात हैदराबादला आपले दोन्ही सामने गमावावे लागले. पहिल्या लढतीत हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. यानंतर बुधवारी त्यांचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध ६ धावांनी पराभव झाला. IPL 2021 : विजयानंतर राजस्थान रॉयल्सनं केले दिल्ली कॅपिटल्सला ट्रोल
या दोन्ही सामन्यांत पराभव झालेला असला, तरी क्षेत्ररक्षणामध्ये मात्र हैदराबादने इतर संघांना मागे टाकले आहे. दोन्ही सामन्यांत मिळून हैदराबादकडे एकूण १३ झेल घेण्याची संधी मिळाली आणि हे सर्व झेल पकडण्यात हैदराबादचे खेळाडू यशस्वी ठरले. त्यामुळेच भविष्यात क्षेत्ररक्षकांच्या जोरावर हैदराबादने प्ले ऑफमध्ये धडक मारली, तर आश्चर्य वाटायला नको. महेंद्रसिंग धोनी पहिल्यासारखा राहिला नाही, CSKला यशस्वी व्हायचं असेल तर...; गौतम गंभीरचं मोठं विधान
कोलकाताविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात हैदराबादने पाच झेल घेतले. यामध्ये अब्दुल समद याने दोन, तर मनीष पांड्ये, वृद्धिमान साहा आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी एक झेल घेतला. यानंतर झालेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने ८ झेल घेतले. मनीष पांड्ये आणि वृद्धिमान साहा यांनी प्रत्येकी २ झेल घेतले, तर डेव्हिड वॉर्नर, राशिद खान, शाहबाझ नदीम आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी एक झेल घेतला. एकीकडे हैदराबादने एकही झेल सोडला नसताना, दुसरीकडे उर्वरीत सातही संघांनी आपापल्या सामन्यात अनेक झेल सोडत सुमार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले आहे.
Web Title: IPL 2021: ‘Yaa’ team has not released a single catch so far
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.