Mahendra Singh Dhoni opens up on his future in the IPL : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या गुणतालिकेतील अव्वल दोन संघांतील स्थान मजबूत करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ ( Chennai Super Kings) आज पंजाब किंग्सचं ( Punjab Kings) आव्हान परतवून लावण्यासाठी मैदानावर उतरला आहे. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा सामना जिंकल्यास पंजाबच्याही प्ले ऑफच्या आशा काही प्रमाणात जीवंत राहणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठीही हा Do or Die असा सामना आहे. CSK व PBKS चा हा अखेरचा साखळी सामना आहे आणि महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) सर्वांना बुचकळ्यात टाकणारे विधान केलं आहे.
आयपीएल २०२०तील अखेरच्या साखळी सामन्यात धोनीला सवाल करण्यात आला होता. CSKच्या पिवळ्या जर्सीतील हा तुझा अखेरचा सामना का?; त्यावर त्यानं डेफिनेटली नॉट असे लगेच उत्तर दिले. पण, यावेळी त्याच प्रश्नावर त्याचं उत्तर काही वेगळं आलं. धोनीचा फॉर्म व वय या दोन्ही गोष्टी सध्या चिंतेचा विषय आहे. ४० वर्षीय धोनीकडे आता टीम इंडियाच्या मेंटॉरची जबाबदारी आली आहे आणि अशात जर तो आयपीएल फ्रँचायझीसोबत कायम राहिल्यास कॉन्फीक्ट ऑफ इंटरेस्टचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे तो CSKसोबत राहिल की नाही, यावरही चर्चा सुरू आहे. MS Dhoni opens up on his future in the IPL
दोन दिवसांपूर्वी चेन्नईत घरच्या प्रेक्षकांसमोर निरोपाचा सामना खेळायला आवडेल, असे म्हणणाऱ्या धोनीनं आज सर्वांना बुचकळ्यात टाकले. तो म्हणाला,''पुढच्या पर्वात तुम्ही मला पिवळ्या जर्सीतच पाहाल, परंतु मी CSKकडून खेळेन की नाही, याची मलाही कल्पना नाही. पुढे अनेक अनिश्चितता आहेत. दोन नवीन संघ दाखल होत आहेत आणि रिटेशन नियम काय आहेत, हे माहीत नाही.''
आता धोनीला नेमकं काय सुचवायचंय हे त्यालाच ठावूक, पण तो CSKच्या मेंटॉर किंवा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल असा अंदाज बांधला जात आहे.