IPL 2021: बेडरुमचा कॅमेरा बंद करायला विसरला राहुल तेवतिया, मग पुढे काय घडलं तुम्हीच पाहा...

IPL 2021, Rahul Tewatia: राजस्थान रॉयल्स संघाच्या (rajasthan royals) ट्विटर हँडलवर राहुल तेवतियाचा असाच एक गमतीशीर व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 05:40 PM2021-04-02T17:40:54+5:302021-04-02T17:41:37+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021Rahul Tewatia forgot to turn off the bedroom camera then you see what happened next | IPL 2021: बेडरुमचा कॅमेरा बंद करायला विसरला राहुल तेवतिया, मग पुढे काय घडलं तुम्हीच पाहा...

IPL 2021: बेडरुमचा कॅमेरा बंद करायला विसरला राहुल तेवतिया, मग पुढे काय घडलं तुम्हीच पाहा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2021, Rahul Tewatia: आयपीएलचा रणसंग्राम ९ एप्रिलपासून सुरू होतोय. त्यासाठी प्रत्येक संघ आता जोरदार तयारी देखील लागला आहे. कोरोनामुळे बायो बबलच्या नियमांचं पालन करुन प्रत्येक संघ जोरदार सराव करत आहे. आयपीएल म्हटलं की धमाल, मस्ती देखील आलीच. असेच काही खेळाडूंचे धमाल व्हिडिओ आणि क्षण प्रत्येक संघ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्स वेळोवेळी शेअर देखील करत असतात. यावेळी राजस्थान रॉयल्स संघाच्या ट्विटर हँडलवर राहुल तेवतियाचा असाच एक गमतीशीर व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. 

आयपीएलमधील प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू बायो बबलमध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडू त्यांना निर्धारित केलेल्या हॉटेलच्या रुममध्येच वास्तव्याला असणार आहेत. राहुल तेवतियाच्या रुममध्ये असलेला व्हिडिओ कॅमेरा बंद करण्यास तो विसरला आणि एक धमाल व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. 

राहुल तेवतिया त्याच्या बेडरुममध्ये फोनवर बोलतोय आणि सोबत बॅटिंगचा सराव देखील करताना दिसतोय. राहुल फोनवर अशा अनेक गोष्टी आणि दिलखुलासपणे बोलताना दिसतोय. बेडरुममधला कॅमेरा सुरू आहे याची जराशीही कल्पना त्याला नाहीय. सोशल मीडियात या व्हिडिओची आता जोरदार चर्चा होत असून त्याचे फॅन्स मजेशीर प्रतिक्रिया देखील देत आहेत. 

आयपीएलमध्ये राहुल तेवतियानं आतापर्यंत ३४ सामन्यांमध्ये ३६६ धावा केल्या असून २४ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या गेल्या मोसमात राहुल तेवतियानं १४ सामन्यात ४२.५० च्या सरासरीनं २५५ धावा केल्या आहेत. यात १० विकेट्स देखील त्यानं घेतल्या होत्या. २७ वर्षीय तेवतियाची इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघातही निवड झाली होती. पण अंतिम ११ खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळू शकलं नाही. 
 

Web Title: IPL 2021Rahul Tewatia forgot to turn off the bedroom camera then you see what happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.