IPL 2021: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आई आणि वडिलांनी कोरोनावर मात केली आहे. दोघांनाही मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोघंही रांची येथील त्यांच्या राहत्या घरी आराम करत आहेत.
IPL 2021: बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद, वारंवार चाचण्या आणि खेळाडूंचं लसीकरण; BCCI कडून आणखी कडक नियम
धोनीचे वडील पान सिंग आणि आई देवकी यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दोघांनाही रांची येथील पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दोघांनाही सौम्य लक्षणं असल्यानं घाबरण्याची कोणतीही गरज नसल्याचं डॉक्टरांनी याआधीच जाहीर केलं होतं. अखेर मंगळवारी दोघांचीही कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. (ipl 2021ranchi ms dhoni mother and father recovered from corona got discharged from hospital ranchi)
IPL 2021: 'होय, आम्ही बिथरलोय', रिकी पाँटिंगचं भारतातील कोरोना वाढीवर मोठं विधान!
धोनी सध्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचं नेतृत्व करत असून बायो बबलच्या नियमांचं पालन करत आहे. धोनीच्या आई-वडिलांना ज्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याच दिवशी धोनीचा मुंबईच्या वानखेडे मैदानात सामना होता. या सामन्यात धोनी खेळला आणि संघामध्ये धोनीच्या कुटुंबियांच्या आरोग्याबाबत माहिती देण्यात आली होती असं संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, झारखंडमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढ काही केल्या थांबताना दिसत नाही. गेल्या २४ तासांमध्ये झारखंडमध्ये ६ हजार २० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता ५० हजारावर गेली आहे.