Join us  

Virat Kohli feels helpless IPL 2022 : असहाय्यता काय असते हे समजलं, असं कधीच घडलं नव्हतं - विराट कोहली हताश; जाणून घ्या नेमकं कारण

Virat Kohli feels helpless IPL 2022 : भारतीय संघाचा व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) माजी कर्णधार विराट कोहली सध्या बॅड पॅच मधून जातोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 4:57 PM

Open in App

Virat Kohli feels helpless IPL 2022 : भारतीय संघाचा व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) माजी कर्णधार विराट कोहली सध्या बॅड पॅच मधून जातोय. मागील १०० डावांमध्ये त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही आणि इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्येही त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलच्या एकाच पर्वात ३ वेळा गोल्डन डकवर बाद होणारा तो RCBचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्यामुळे टीकाकारही त्याला धारेवर धरत आहेत, परंतु बाहेरील आवाजाकडे कसे दुर्लक्ष करायचे, हे विराटचा चांगले माहित्येय. मात्र, जर तो आतूनच त्याला असहाय्य वाटत असेल तर काय?

आयपीएल २०२२त विराटला १२ सामन्यांत २१६ धावा करता आल्या आहेत आणि यात एकदाच तो ५०+ धावा करू शकला आहे. RCB ने ३३ वर्षीय विराटच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यात त्याने आपली व्यथा मांडली आहे. तो म्हणाला,''जेव्हा दुसऱ्यांदा मी गोल्डन डकवर बाद झालो तेव्हा मला जाणवले की असहाय्य होणे म्हणजे काय असतं... कारकीर्दित असे माझ्यासोबत कधीच घडले नव्हते. त्यामुळेच मी गोल्डन डकवर बाद झाल्यावर हसलो.''

विराट कोहलीच्या या कामगिरीवर सर्वच टीका करत सुटले आहेत. त्यात भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटला ब्रेक घेण्याचा सल्ला दिलाय. त्यावर विराटने स्वतःचे मत मांडले आहे. तो म्हणाला,''आताच्या क्षणाला मला काय वाटतंय हे ते समजू शकत नाहीत. माझ्या भावना त्यांना कळणार नाहीत. माझं आयुष्य ते जगू शकत नाहीत. मग मी त्यांचा आवाज कसा कमी करता येईल? तुम्ही एक तर टीव्हीचा आवाज म्यूट करा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. मी या दोन्ही गोष्टी करतो.'' 

यावेळी विराटला एबी डिव्हिलियर्सला किती मिस करतोय याबाबतही विचारले गेले. त्यावर कोहलीनेही एबीची खूप आठवण येत असल्याचे मान्य केले आणि पुढील पर्वात एबी RCBच्या डग आऊटमध्ये कोणत्यातरी जबाबदारीत दिसेल अशी आशा व्यक्त केली.  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - १२ सामने, १४ गुणउर्वरित लढती - पंजाब किंग्स ( १३ मे) व गुजरात टायटन्स ( १९ मे); प्ले ऑफसाठी RCBला किमान १८ गुण तरी मिळवावे लागतील आणि त्यासाठी त्यांना दोन्ही लढती जिंकणे महत्त्वाच्या आहेत. त्यांनी एकच लढत जिंकली, तर दिल्ली, हैदराबाद व पंजाब यांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावे लागणार आहे. RCBचा नेट रन रेट -०.११५ असा आहे आणि अशा परिस्थितीत तो त्यांचा विरोधात जाऊ शकते. दिल्ली व हैदराबादचा नेट रन रेट त्यांच्यापेक्षा चांगला आहे. 

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App