इंडियन प्रीमिअर लीगचे १५ वे पर्व २६ मार्चपासून सुरू होत आहे. पण, परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत अजूनही शंका आहे. त्यात क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मंगळवारी बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या आफ्रिकन खेळाडूंना काही सामन्यांसाठी मुकावे लागणार आहे. त्यात दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का बसला आहे. अॅनरीच नॉर्खिया ( Anrich Nortje) आयपीएल २०२२ मध्ये खेळण्याची शक्यता मावळत चालली आहे. नोव्हेंबर २०२१पासून नॉर्खिया क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे आणि अजूनही तो दुखापतीतून सावरलेला नाही. CSA ची वैद्यकिय टीम त्याच्या तंदुरूस्तीवर लक्ष ठेवून आहे. त्यात आफ्रिकेच्या अन्य खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत BCCIने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला ( CSA) पत्र लिहीले आहे.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी आफ्रिकेच्या १६ सदस्यीय संघाची घोषणा झाली. त्यात आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंचाही समावेश असल्याने आयपीएल २०२२च्या पहिल्या तीन आठवड्यांच्या खेळाला त्यांना मुकावे लागू शकते. दक्षिण आफ्रिका-बांगलादेश यांच्यात तीन वन डे व दोन कसोट सामन्यांची मालिका होणार आहे आणि ती १२ एप्रिलला संपणार आहे. क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्यामुळे तो लखनौ सुपर जायंट्ससाठी सुरुवातीपासून उपलब्ध असेल. पण, कागिसो रबाडा, मार्को येनसेन, एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व लुंगी एनगिडी यांच्या सहभागाबाबत संभ्रम आहे.
आयपीएल २०२२मध्ये खेळणारे आफ्रिकेचे खेळाडू - कागिसो रबाडा ( पंजाब), फॅफ ड्यू प्लेसिस ( बंगळुरू), क्विंटन डी कॉक ( लखनौ), एनरिच नॉर्खिया ( दिल्ली), मार्को येनसेन ( हैदराबाद), डेव्हिड मिलर ( गुजरात), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( मुंबई), एडन मार्कराम ( हैदराबाद), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( राजस्थान), लुंगी एनगिडी ( दिल्ली), ड्वेन प्रेटोरियस ( चेन्नई)
बीसीसीआयचे CSAला पत्र अन् विनंतीदक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत बीसीसीआय आता CSAचे संचालक ग्रॅमी स्मिथ यांच्याशी चर्चा करणार आहेत. ''बीसीसीआय यासंदर्भात ग्रॅमी स्मिथ यांच्याशी चर्चा करणार आहेत आणि काही अव्वल खेळाडूंना थोडं आधी आयपीएलसाठी रिलीज करता येईल का अशी विनंती करणार आहेत,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), केशव महाराज ( उप कर्णधार), क्विंटन डी कॉक, झुबायर हम्झा, मार्को येनसेन, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पार्नेल, एंडील फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले वेरेयने