Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : चेन्नई सुपर किंग्सचा मॅच विनर फॅफ ड्यू प्लेसिस आता आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाकडून खेळणार आहे. विराट कोहली आणि फॅफ ड्यू प्लेसिस ही जोडी आता RCB साठी सलामीला खेळताना दिसेल, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आहेच फटकेबाजी करायला. RCBने फॅफ ड्यू प्लेसिससाठी लिलावात ७ कोटी मोजले आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये ५४ चेंडूंत शतक झळकावले.
बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये कोमिला व्हिक्टोरियन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना फॅफ ड्यू प्लेसिसने ५४ चेंडूंत १२ चौकार ३ षटकारासह १०१ धावा केल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर व्हिक्टोरियन्स संघाने ५ बाद १८२ धावा केल्या. फॅफने २०२१च्या आयपीएलमध्ये CSKसाठी १६ सामन्यांत ६३३ धावा कुटल्या होत्या आणि जेतेपदात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याने एकूण १०० सामन्यांत २९३५ धावा केल्या आहेत आणि त्यात २२ अर्धशतकांचा समावेश आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
रिटेन केलेले खेळाडू - विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी); शिल्लक रक्कम
आज खरेदी केलेले खेळाडू - वनिंदु हसरंगा ( १०.७५ कोटी), दिनेश कार्तिक ( ५.५० कोटी), हर्षल पटेल ( १०.७५ कोटी), फॅफ ड्यू प्लेसिस ( ७ कोटी)