Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी सुरू असलेल्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) आतापर्यंत दोनच खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतले. इशान किशनसाठी त्यांनी सर्वाधिक १५.२५ कोटी मोजले. त्यानंतर त्यांनी 'Baby AB' साठी तगडी रक्कम मोजून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. नुकत्याच पार पडलेल्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या युवा फलंदाजाने सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला होता. IPL Auction 2022 Live Updates
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांचा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस यानं विश्वविक्रमीकामगिरी केली. एबी डिव्हिलियर्सचा ( AB de Villiers) जबरा फॅन असलेला ब्रेव्हिस आता IPL 2022मध्येही धमाका करण्यासाठी सज्ज आहे. आयपीएल लिलावापूर्वी त्यानं वर्ल्ड कप स्पर्धा गाजवून साऱ्यांचे लक्ष वेधले होते. U19 world cup स्पर्धेत त्याने विश्वविक्रम नोंदवला. हा विक्रम १८ वर्ष भारताचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याच्या नावावर होता. वर्ल्ड कप स्पर्धेत ४०० धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर ६ सामन्यांत ८४.३३ च्या सरासरीने ५०६ धावा आहेत. त्यात २ शतकं व ३ अर्धशतकांचा समावेश आहे. यासह त्याने धवनचा विक्रम मोडला. IPL Auction 2022 News in Marathi
मुंबई इंडियन्सने २० कोटी मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी ३ कोटी मोजले.
ब्रेव्हिसची U19 World Cup 2022 मधील कामगिरी
५० धावा ( ७० चेंडू) वि. वेस्ट इंडिज ( सराव सामना)
६५ धावा ( ९९ चेंडू) वि. भारत
१०४ धावा ( ११० चेंडू) व २-१८ वि. यूगांडा
९६ धावा ( १२२ चेंडू) वि. आयर्लंड
९७ धावा ( ८८ चेंडू) व २-४० वि. इंग्लंड
६ धावा व १-५२ वि. श्रीलंका
१३८ धावा वि. बांगलादेश
१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत सलग चार सामन्यांत ५०+ धावा करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला आहे. भारताच्या शुबमन गिलनं अशी कामगिरी केली होती आणि त्यानंतर आता ब्रेव्हिसनं हा विक्रम केला
Web Title: IPL 2022 Auction : ICC U19 World Cup 2022 player of the tournament 'Baby AB' Dewald Brevis will be playing for Mumbai Indians - 3 crore
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.