Join us  

IPL 2022 Auction: सगळी भाजी खरेदी केल्यावर कोथिंबीर फ्री!!! अर्जुन तेंडुलकरच्या खरेदीवर नेटकऱ्यांची बॅटिंग

IPL 2022 Auction: अर्जुन तेंडुलकरसाठी मुंबई इंडियन्सनं मोजले ३० लाख रुपये; नेटकऱ्यांनी पाडला मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 12:50 PM

Open in App

Arjun Tendulkar, IPL 2022 Auction : मुंबई इंडियन्सनं यंदाच्या हंगामासाठी तगडा संघ बांधला. या संघात एक अपेक्षित नाव म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर. अर्जुनचं नाव येताच मुंबईने ऑक्शन पॅडल उंचावले, परंतु गुजरात टायटन्सनेही लगेच पॅडल उंचावल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मुंबई संघाचे मालक आकाश अंबानी गुजरातच्या टेबलकडे पाहून हसू लागले. अखेर मुंबईनेच ३० लाखांत त्याला आपल्या संघात घेतलं. 

मुंबई इंडियन्सच्या संघानं याआधीही अर्जुनला संघात घेतलं होतं. त्यावेळी त्याच्यासाठी २० लाख रुपये मोजण्यात आले होते. मात्र अर्जुनला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता मुंबईनं अर्जुनला ३० लाख रुपये मोजून संघात घेतलं आहे. मात्र मुंबईचा तगडा संघ पाहता त्याला संधी मिळण्याची शक्यता अतिशय कमी आहे. दरम्यान मुंबईनं अर्जुनसाठी लावलेल्या बोलीवर नेटकऱ्यांनी तुफान बॅटिंग केली आहे. सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: पाऊस पडला.

मोठमोठ्या खेळाडूंना संघात घेतल्यानंतर अर्जुन तेंडुलकरची निवड करणं म्हणजे भाजी खरेदी करून झाल्यानंतर कोंथिबीर खरेदी करण्यासारखं असल्याचं ट्विट एकानं केलं आहे. मागील आयपीएलमध्ये एकही सामना न खेळता २० लाखाचे ३० लाख झाले, अशा स्वरुपाचे ट्विट पाहायला मिळत आहेत. मुंबईनं ३० लाख मोजून अर्जुनला सामने पाहण्यासाठी खरेदी केलंय, अशा प्रकारच्या कमेंट्सदेखील वाचायला मिळत आहेत.

टॅग्स :आयपीएल लिलावमुंबई इंडियन्सअर्जुन तेंडुलकर
Open in App