IPL 2022 Auction: ऑक्शनच्या अंतिम यादीत नाव आल्यावर भावूक झाला S Sreesanth; लोकांकडे केली खास विनंती

Indian Premier League 2022 Auction: श्रीसंत सध्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 04:15 PM2022-02-02T16:15:35+5:302022-02-02T16:16:14+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 Auction s Sreesanth gets emotional after being named in final list of auctions Special request made to the people social media | IPL 2022 Auction: ऑक्शनच्या अंतिम यादीत नाव आल्यावर भावूक झाला S Sreesanth; लोकांकडे केली खास विनंती

IPL 2022 Auction: ऑक्शनच्या अंतिम यादीत नाव आल्यावर भावूक झाला S Sreesanth; लोकांकडे केली खास विनंती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमियर लीग २०२२ (Indian Premier League 2022) च्या 15 व्या हंगामाच्या लिलाव प्रक्रियेसाठी आता केवळ अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया या महिन्यात १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगळुरूमध्ये पूर्ण होईल. लिलाव प्रक्रियेपूर्वी बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत ५९० खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. सहभागी ५९० क्रिकेटपटूंपैकी, एकूण २२८ कॅप्ड (आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत), तर ३५५ खेळाडू असे आहेत ज्यांनी त्यांच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेलं नाही. याशिवाय सात सहयोगी (Associates) देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे.

बीसीसीआयने निवडलेल्या खेळाडूंमध्ये देशाचा ३८ वर्षीय वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत (S. Sreesanth) याचीही निवड झाली आहे. टीम इंडियातून बाहेर पडलेल्या या भारतीय वेगवान गोलंदाजाने आगामी लिलावासाठी त्याची बेस प्राईज ५० लाख रुपये ठेवली आहे. यापूर्वी, त्याने मागील हंगामासाठी म्हणजेच आयपीएल २०२१ साठी त्याची बेस प्राईज ७५ लाख रुपये ठेवली होती.


आयपीएलमध्ये शॉर्टलिस्ट झाल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीसंतनं आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय त्याच्यावर प्रेम करणाऱ्या क्रिकेटप्रेमींचेही त्याने आभार मानले आहेत. आगामी लिलावात श्रीशांतने त्याच्या चाहत्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे. 'तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम. खूप खूप आभार आणि धन्यवाद. मी तुम्हा सर्वांचा सदैव ऋणी राहीन. आयपीएलच्या लिलावासाठीही प्रार्थना करा. ॐ नमः शिवाय,' असं ट्वीट श्रीसंतनं केलं आहे.

Web Title: IPL 2022 Auction s Sreesanth gets emotional after being named in final list of auctions Special request made to the people social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.