IPL 2022 Auction : इयॉन मॉर्गनने आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला अंतिम फेरीपर्यंत मजल मारून दिली, तरीही त्यांनी इंग्लंडच्या कर्णधाराला रिलीज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आंद्रे रसेल ( १२ कोटी), वरुण चक्रवर्थी ( ८ कोटी), वेंकटेश अय्यर ( ८ कोटी) , सुनील नरीन ( ६ कोटी) या खेळाडूंना KKR ने कायम राखले. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी कर्णधाराच्या शोधात होते आणि त्यांनी लिलावात १२.२५ कोटी रुपये मोजून श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) ताफ्यात घेतले. त्यामुळे आता श्रेयस अय्यरच IPL 2022 त कोलकाताचा कर्णधार असेल, अशी चर्चा सुरू झाली. परंतु, KKRचे सीईओ वेंकी मैसूर यांनी ( CEO Venky Mysore ) यांनी गुगली टाकली. त्यांनी कर्णधारपदाच्या शर्यतीत दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. IPL Auction 2022 Live Updates
श्रेयसने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात ८० धावांची खेळी करून मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने २०२०मध्ये आयपीएल फायनलपर्यंत धडक मारली होती आणि त्यामुळे भावी कर्णधार म्हणून त्याच्यावर गुंतवणूक करणे कोणत्याही फ्रँचायझीच्या फायद्याचे ठरले असते. कोलकाताने त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स ( Pat Cummins) याला ७.२५ कोटींत खरेदी केले. नितीश राणासाठी त्यांनी ८ कोटी मोजले.
वेंकी मैसूर म्हणाले की,''पहिल्या सत्र आमच्या नावावर राहिले याचा आनंद आहे. पॅट कमिन्ससाठी आम्हाला सर्वाधिक रक्कम मोजावी लागेल असे वाटले होते, परंतु त्याला इतक्या कमी किमतीत घेता आले याचा आनंद आहे. श्रेयस अय्यर हा दमदार फलंदाज आहे आणि तोही आमच्या ताफ्यात आल्याचा आनंद आहेच.'' अय्यरला कर्णधार बनवणार का?, या प्रश्नावर मैसूर म्हणाले, तो निर्णय प्रशिक्षक आणि आमच्या थिंक टँकचा आहे. सध्या आम्ही ऑक्शनवर लक्ष देत आहोत. कमिन्स आणि श्रेयस हे कर्णधारपदाचे दोन तगडे उमेदवार आमच्याकडे आहेत.'' IPL Auction 2022 News in Marathi
दरम्यान, भारताचा सलामीवीर शिखर धवन याला पंजंबा किंग्सने ८.२५ कोटींत खरेदी केली, फिरकीपटू आर अश्विनला राजस्थान रॉयल्सने ५ कोटींत ताफ्यात दाखल करून घेतले. पंजाब किंग्सने कागिसो रबाडासाठी ९.२५ कोटी, राजस्थान रॉयल्सने ट्रेंट बोल्टसाठी ८ कोटी, तर गुजरात टायटन्सने मोहम्मद शमीसाठी ६.२५ कोटी मोजले. फॅफ ड्यू प्लेसिस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहे आणि त्याच्यासाठी ७ कोटी मोजले. लखनौ सुपर जायंट्सने क्विंटन डी कॉकसाठी ६.७५ कोटी मोजले. IPL Auction Live,IPL auction,