IPL 2022 Auction Live: यंदाच्या हंगामासाठी सुरू असलेल्या मेगालिलावात अद्याप भारताकडून पदार्पण न केलेल्या कॅटेगरीमध्ये आवेश खानवर जोरदार बोली लागली. यंदाच्या हंगामात नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने आवेश खानवर दमदार बोली लावली. भारतीय खेळाडूंवर सुरू असलेली पैशांची उधळण आवेश खानच्या वेळीही सुरूच राहिली. भारतीय संघातून अद्याप न खेळलेल्या (Uncapped Players) विभागात आवेश खान हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला तब्बल १० कोटींच्या बोलीवर विकत घेतला. IPL 2022 Auction Highlights
आतापर्यंत IPL च्या इतिहासात भारताकडून न खेळलेल्या खेळाडूंपैकी चेन्नई सुपर किंग्सने कृष्णप्पा गौतमवर ९ कोटी २५ लाखांची बोली लावण्यात आली होती. मात्र आज तो विक्रम मोडीत काढला गेला. आवेश खानवर केवळ २० लाखांची मूळ किंमत ठेवण्यात आली होती. पण त्याच्यावर जोरदार बोली लागली. अखेर लखनौ सुपर जायंट्स संघाने त्याला तब्बल १० कोटींच्या जोरावर संघात सामील करून घेतलं.
Web Title: IPL 2022 Avesh Khan becomes Most Expensive Uncapped Indian Cricketer to cross 10 Crores in IPL Auction history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.