नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेने (आयसीसी) आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा पार पडणार आहे. त्यानंतर, आता बीबीसीआयचे सचिव जय शहा यांनी देशाती आयपीएलच्या 15 हंगामाची घोषणा केली आहे. तसेच, यंदाची आयपीएल स्पर्धा भारतातच घेण्यात यावी, यासाठी सर्वच संघाचे मालक आग्रही आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे गतवर्षीच्या आयपीएल स्पर्धा युएई आणि दुबईत पार पडल्या आहेत. त्यामुळे, संयोजकांना मोठा आर्थिक भारही सहन करावा लागला आहे. त्यामुळेच यंदाच्या आयपीएल स्पर्धा देशात व्हाव्यात, यासाठी सर्वच संघांचे मालक आग्रही आहेत. जय शहा यांनी यंदाच्या आयपीएल सिझनची घोषणाच केली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात यंदाच्या 15 व्या आयपीएल हंगामाला सुरुवात होईल. तर, मे महिनाअखेरीस हा सिझन संपेल, असे शहा यांनी सांगितले. स्पर्धेतील बहुतांश संघांच्या मालकांनी यंदाचा सिझन भारतातच खेळविण्यात यावा, अशी मागणी केल्याचेही शहा म्हणाले.
23 ऑक्टोबर पासून टी-20 विश्वचषक
टीम इंडिया 23 ऑक्टोबरपासून विश्वचषकातील आपल्या अभियानाला सुरुवात करेल. पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान 23 ऑक्टोबरला एकमेकांसमोर असतील. याआधी टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान 2021मध्ये भिडले होते. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते.