IPL 2022, CSK in Trouble : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरूवात होण्यात अवघे ६ दिवस शिल्लक राहिली आहेत. बहुतेक सर्व संघांचे खेळाडू आपापल्या फ्रँचायझींच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. काही परदेशी खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यामुळे थोडे उशीरा IPL 2022च्या बायो बबलमध्ये दाखल होतील. पण, गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ससमोर ( Chennai Super Kings) वेगळीच समस्या उभी राहिली आहे. त्यांनी मोठ्या भरवशाने IPL 2022 साठी सुरेश रैना ( Suresh Raina), फॅफ ड्यू प्लेसिस या महत्त्वाच्या खेळाडूंना वगळून ज्याला ८ कोटींत रिटेन केले, तोच खेळाडू अद्याप भारतात दाखल झालेला नाही. चेन्नई सुपर किंग्सनेआयपीएल २०२२ साठी कर्णधार MS Dhoniसह रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड व इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) यांना रिटेन केले.
स्टार ऑल राऊंडर मोईन अलीने CSK चं टेंशन वाढवलं आहे. तो सुरुवातीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तो मागील २० दिवसांपासून भारतात येण्यासाठी VISA मिळवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अजूनही त्याला व्हिसा मिळालेला नाही. २६ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गतविजेता चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गत उपविजेता कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. पण, मोईन अलीला अजूनही व्हिसा न मिळाल्याने फ्रँचायझीची चिंता वाढली आहे.
CSK चे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी शनिवारी सांगितले की, ''स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तो मुंबईत CSK च्या ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे. २८ फेब्रुवारीला मोईन अलीने व्हिसासाठी अर्ज केला होता आणि २० दिवस उलटूनही त्याचा व्हिसा मंजूर झालेला नाही. भारतात त्याचे वारंवार येणे असूनही त्याला आताच व्हिसा का मिळत नाही, याचे आश्चर्य वाटतेय.''
''व्हिसा मिळताच पुढची फ्लाईट पकडून भारतासाठी रवाना होईल, असे अलीने आम्हाला सांगितले आहे. BCCI पण आम्हाला याबाबतीत मदत करत आहे. सोमवारी २१ मार्चपर्यंत त्याला व्हिसा मिळेल, अशी आशा आहे,''असे मत विश्वनाथ यांनी व्यक्त केले.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी), केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).
Web Title: IPL 2022, Chennai Super kings in trouble, England all-rounder Moeen Ali set to miss opening match vs KKR due to VISA issue
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.