गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आयपीएल २०२२त त्यांना ८ सामन्यांत ६ पराभव पत्करावे लागले आहेत आणि त्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याच्या मार्गावर आहे. CSKच्या मागे यंदा दुखापतीचे ग्रहण लागलेले पाहायला मिळाले. स्पर्धा सुरू होण्याआधीची १४ कोटींचा गोलंदाज दीपक चहर दुखापत झाला. त्यानंतर अॅडम मिल्नेलाही माघार घ्यावी लागली आणि काल पंजाब किंग्सविरुद्धच्या ( PBKS) लढतीपूर्वी अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali)ला सराव करताना दुखापत झाली. मनगटाच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या खेळाडूला आता आयपीएल २०२२मधील काही सामन्यांना मुकावे लागणार आहे.
शनिवारी सराव करताना त्याला ही दुखापत झाली. CSKला अद्याप मोईन अलीच्या दुखापतीच्या स्कॅन रिपोर्टची प्रतीक्षा आहे. त्यानंतर मोईन अली नेमक्या किती सामन्यांना मुकेल, हे चित्र स्पष्ट होईल. मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ एप्रिलला झालेल्या लढतीत मोईन अलीला अंतिम ११मध्ये स्थान दिले नव्हते. तसेच तो काल पंजाब किंग्सविरुद्धही खेळला नाही. आयपीएल २०२२च्या सुरूवातीच्या पहिल्या सामन्याला त्याला व्हिसा न मिळाल्यामुळे मुकावे लागले होते.
मोईन अलीला ५ सामन्यांत १७.४० च्या सरासरीने ८७ धावा करतका आल्या आहेत आणि त्याने एकच विकेट घेतली आहे. २०२१च्या चेन्नई सुपर किंग्सच्या जेतेपदात मोईन अलीने महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्याने ३५७ धावांसह ६ विकेट्स घेतल्या होत्या. यंदा चेन्नई सुपर किंग्सचा संघ ८ सामन्यांत २ विजय मिळवू शकला आहे.
- दिपक चहर ( दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार)
- अॅडम मिल्ने ( दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार)
- डेव्हॉन कॉनवे ( लग्नासाठी सुट्टीवर)
- मोईन अली ( दुखापतग्रस्त, 3-4 सामन्यांना मुकण्याची शक्यता