Chris Lynn on Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचेआयपीएल २०२२मधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मुंबई इंडियन्सला गुरुवारी सलग सातवा पराभव पत्करावा लागला आणि आयपीएलच्या एका पर्वात सलग सात सामने गमावणारा तो पहिलाच संघ ठरला. नव्या खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या मुंबईची ही अवस्था पाहून चाहते निराश झाले आहे. त्यात MI चा माजी सलामीवीर ख्रिस लिन ( Chris Lynn) याने संघात दोन गट पडल्याचा दावा केला आहे. मुंबई इंडियन्सकडे ११ जणांचा एक संघ नसून ११ वेगवेगळे लोकं दिसत असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
आयपीएलम २०२० व २०२१मध्य लिन मुंबई इंडियन्सचा सदस्य होता आणि त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. तो म्हणाला,' जय-पराभव सुरूच राहतो. पण, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व मानसिक कणखरता ही मुंबई इंडियन्सची समस्या आहे. संघ गटांत विभागला असल्याचे स्पष्ट दिसतेय. जेव्हा तुम्ही गुणतालिकेत तळाला असता तेव्हा अनुभवी खेळाडू किरॉन पोलार्ड हा मदतीसाठी पुढे येतो आणि धीर देतो. पण, यंदाच्या पर्वात हे चित्र पाहायला मिळालेले नाही. आता संघ तुकड्या तुकड्यात विभागत चालला आहे. हे चांगले संकेत नाहीत. ड्रेसिंग रुममधीलही वातावरण चांगले नसेल, असे मला वाटते.''
ऑस्ट्रेलियाकडून चार वन डे व १८ ट्वेंटी-२० सामने लिनने खेळले आहेत. तो पुढे म्हणाला,''दोन वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही स्पर्धा जिंकलो होतो, तेव्हाच्या तुलनेत परिस्थिती परस्पर विरुद्ध आहे. तेव्हा कामगिरी कशी आणखी सुधारता येईल, याची चर्चा व्हायची. यंदा तसे काही दिसत नाही. ११ जणांचा हा संघ नसून ११ वैयक्तिक खेळाडू दिसत आहेत. आशा करतो की हे चित्र लवकरच चबदलेल.''
मुंबई इंडियन्सच्या प्ले ऑफच्या आशा किती?
मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्याशी आणखी एकदा खेळणार आहे, तर गुजरात टायटन्स व सनरायझर्स हैदराबाद यांनाही भिडणार आहे. सध्या मुंबईचा संघ गुणतालिकेत -०.८९२ नेट रनरेटसह १०व्या क्रमांकावर आहे. त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी उर्वरित सातही सामने जिंकावे लागतील. पण, तरीही त्यांची प्ले ऑफमध्ये जाण्याची शक्यता ही 0.134% आहे. गुजरात व बंगळुरू प्रत्येकी १० गुणांसह अव्वल दोन क्रमांकावर आहेत. राजस्थान, लखनौ व हैदराबाद यांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण आहेत. दिल्ली, कोलकाता व पंजाबच्या खात्यात प्रत्येकी ६, तर चेन्नईचे ४ गुण आहेत.
Web Title: IPL 2022 : Chris Lynn, who was with Mumbai Indians for two seasons, says he has begun noticing signs of "factions" within the Mumbai camp
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.