Join us  

David Warner  IPL 2022, CSK vs DC Live Updates : डेव्हिड वॉर्नर खवळला, अम्पायर Nitin Menon यांच्याकडे रागाने बघतच पेव्हेलियनच्या दिशेने गेला, Video 

IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वात पुन्हा एकदा अम्पायरच्या निर्णय चर्चेत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 10:22 PM

Open in App

IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या 15व्या पर्वात पुन्हा एकदा अम्पायरच्या निर्णय चर्चेत आला आहे. नितिन मेनन यांनी आज दिल्ली ‌कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला ( David Warner) बाद दिले अन् रामायण घडले.. 

चेन्नई सुपर किंग्सचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी आणखी एक शतकी भागीदार केली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा या दोघांनी चांगला  समाचार घेतला. ऋतुराजचा आजचा खेळ तुलनेने थोडा संथ होता, परंतु कॉनवे सुसाट सुटला. दोघांनी मजबूत पाया रचल्यानंतर CSK च्या पुढच्या फलंदाजांना फटकेबाजी करणे सोपं झालं. शिवम दुबेनेही या आतषबाजीत हात साफ केले. महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) अल्पशा खेळीत दमदार ट्रेलर दाखवला. ऋतुराज ३३ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४१ धावांवर माघारी परतला. 

पुन्हा एकदा डेवॉन कॉनवेला शतकाने हुलकावणी दिली. ४९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह तो ८७ धावांवर खलिल अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. कॉनवे व दुबे यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३३ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. दुबेने १९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी मैदानावर येताच स्टेडियम दणाणून निघाले. नॉर्खियाने २०व्या षटकात सलग दोन विकेट घेत चेन्नईच्या धावसंख्येवर अंकुश लावला. त्याची हॅटट्रिक ड्वेन ब्राव्होन पूर्ण होऊ दिली नाही. चेन्नईने ६ बाद २०८ धावा केल्या. धोनी ८ चेंडूंत २१ धावांवर नाबाद राहिला. 

अखेर केएस भरतला आयपीएल २०२२त खेळण्याची संधी मिळाली. RCBसाठी मॅच विनिंग खेळ करणाऱ्या भरतला दिल्लीने आज खेळवले. डेव्हिड वॉर्नरसोबत तो सलामीला आला आणि दुसऱ्या षटकात दोन चौकार खेचले. पण, सिमरजीत सिंगने कमबॅक करताना चौथ्या चेंडूवर बाऊन्सर टाकून त्याला ( ८)  झेलबाद केले. मिचेल मार्शने येताच चांगले फटके मारले. वॉर्नरही चांगल्या टचमध्ये दिसत होता आणि मग धोनीने महिशा थिक्सानाला गोलंदाजीला आले. थिक्सानाच्या चेंडूवर रिव्हर्स फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू वॉर्नरच्या मांडीवर आदळला. धोनीने जोरदार अपील केले व अम्पायर नितिन मेनन ( Nitin Menon) यांनी त्याला बाद दिले.  वॉर्नरने DRS घेतला अन् त्यात चेंडू व बॅट यांच्यात संपर्क न झाल्याचे स्पष्ट झाले. चेंडू यष्टिंवर आदळताना दिसला अन् तिसऱ्या अम्पायरने हा अम्पायर्स कॉल दिला. जर मेनन यांनी हा निर्णय नाबाद दिला असता तर वॉर्नर खेळत असता. पण, त्यांनी बाद दिल्याने वॉर्नरला माघारी जावे लागले. या निर्णयावर वॉर्नर प्रचंड खवळला आणि पेव्हेलियनमध्ये जाता जाता तो मेनन यांच्याकडे रागानेच बघत गेला. 

 

 

टॅग्स :आयपीएल २०२२डेव्हिड वॉर्नरदिल्ली कॅपिटल्सचेन्नई सुपर किंग्स
Open in App