Join us  

IPL 2022 CSK vs GT Live Updates : आयपीएलच्या इतिहासातील विक्रमी कामगिरीची नोंद CSKच्या हातून झाली; मोडला गेला ४ वर्षांपूर्वीचा विक्रम

IPL 2022, Chennai Super Kings vs Gujarat Titans : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK ) आव्हान संपुष्टात आले आहे आणि ते आज टेबल टॉपर गुजरात टायटन्सचा ( GT) सामना करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 4:37 PM

Open in App

IPL 2022, Chennai Super Kings vs Gujarat Titans : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे ( CSK ) आव्हान संपुष्टात आले आहे आणि ते आज टेबल टॉपर गुजरात टायटन्सचा ( GT) सामना करत आहेत. डेवॉन कॉनवे तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतल्यानंतर ऋतुराज गायकवाड व मोईन अली यांनी CSKचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. मोईन अली ( २१) साई किशोरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पण, झेलबाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटीतून मोठा विक्रम नोंदवला गेला. सहाव्या षटकात त्याने राशिद खानला सलग दोन षटकार खेचले आणि ते विक्रमी ठरले. आयपीएल २०२२मधील तो ८७३वा षटकार ठरला आणि CSKच्या हातून मोठ्या विक्रमाची नोंद झाली.

CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, महिषा थिक्साना, ड्वेन ब्राव्हो या प्रमुख खेळाडूंना आज विश्रांती देण्याचा निर्णय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतला. त्यांच्या जागी नारायण जगदीसन, मिचेल सँटनर, प्रशांत सोलंकी व मथिशा पथिराना यांना संधी दिली. चेन्नईने ज्युनियर मलिंगा Matheesha Pathirana याला आज पदार्पणाची संधी दिली.  १९वर्षीय मथिशा पथिराना याची गोलंदाजी शैली ही दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा ( Lasith Malinga) याच्यासारखी आहे. त्याने २०२० व २०२२च्या १९ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. २० लाखांत त्याला CSKने करारबद्ध केले आहे.  ( पाहा IPL 2022 - CSK vs GT सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड)

तिसऱ्या षटकात शमीने पहिल्याच चेंडूवर कॉनवेला फटका मारण्यास भाग पाडले आणि यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने सोपा झेल टिपला. त्यानंतर ऋतुराज व मोईन यांनी दमदार खेळ केला. या दोघांनी ३९ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. त्यात मोईनने १७ चेंडूंत २१, तर ऋतुराजने २२ चेंडूंत ३३ धावांचे योगदान दिले. साई किशोरच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याचा मोईनचा प्रयत्न फसला आणि राशिद खानने झेल टिपला. पण, अलीच्या दोन षटकांनी आयपीएल २०२२मधील एकूण षटकारांची संख्या ही ८७३* वर पोहोचवली. आयपीएल इतिहासात एकाच पर्वात खेचलेले हे सर्वाधिक षटकार ठरले. 

आयपीएल पर्वातिल सर्वाधिक षटकात

  • ८७३* - २०२२ ( ६२ सामने) आज
  • ८७२ - २०१९ ( ६० सामने)
  • ७८४ - २०१९ ( ६० सामने)
  • ७३४ - २०२० ( ६० सामने)
  • ७३१  - २०१२ ( ७४ सामने)  

 

आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

  • ३७ - जोस बटलर ( राजस्थान रॉयल्स)
  • ३२ - आंद्रे रसेल ( कोलकाता नाईट रायडर्स)
  • २९ - लिएम लिव्हिंगस्टोन ( पंजाब किंग्स)
  • २२ - नितिश राणा ( कोलकाता नाईट रायडर्स )
  • २१ - दिनेश कार्तिक ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) 
टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स
Open in App