Join us  

IPL 2022 CSK vs KKR Live : तो येतोय...!; KKR चा सामना करण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सची ताकद वाढली; आता प्रतिस्पर्धींचं काही खरं नाही

गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात IPL 2022 चा सलामीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह नवी फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 3:46 PM

Open in App

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला अवघ्या काही तासांत सुरूवात होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात IPL 2022 चा सलामीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह नवी फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे. महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपदाची धुरा आता रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवली आहे, तर KKR श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास लिहिण्यासाठी उत्सुक आहेत. दोन्ही संघांना काही प्रमुख खेळाडूंशिवाय हा पहिला सामना खेळावा लागत असला तरी या लढतीपूर्वी CSKची ताकद वाढवणारी बातमी समोर आली आहे. CSK ने आयपीएल २०२२साठी ताफ्यात कायम राखलेला मोईन अली व्हिसा उशीरा मिळाल्याने मुंबईत उशीराने दाखल झाला आहे. त्यामुळे तो पहिल्या सामन्याला मुकणार आहे. त्यात १४ कोटी मोजून ताफ्यात घेतलेला दीपक चहर ( Deepak Chahar) हाही सध्या NCA मध्ये दुखापतीतून सावरत आहे आणि तोही काही सामन्यांना मुकणार आहे. त्याची दुखापत कितपत बरी झाली, याचे अपडेट्स आतापर्यंत CSKकडे नव्हते. पण, शनिवारी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दीपक चहरने NCA मध्ये गोलंदाजी व फलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. तो आता लवकरच चेन्नईच्या ताफ्यात दाखल होण्याची अपेक्षा आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चहरला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्तीसाठी दाखल झाला होता. त्याच्या या दुखापतीने फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली होती. तो आयपीएल २०२२ च्या संपूर्ण पर्वाला मुकणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. पण, २९ वर्षीय अष्टपैलू खेळाडूची तंदुरुस्ती योग्य मार्गावर आहे आणि तो नेट्समध्ये गोलंदाजी व फलंदाजी करताना दिसला.   

सीएसएकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी आधी सांगितले होते की, आम्हाला अजूनही BCCI व NCA यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्यातरी आम्ही दीपक चहरच्या रिप्लेसमेंटचा विचार करत नाही आहोत. दीपक लवकच CSKच्या कॅम्पमध्ये दाखल होईल अशी आम्हाला आशा आहे.  

मोईन अली व दीपक चहर यांच्या अनुपस्थितीत कशी असेल चेन्नई सुपर किंग्स Playing XI?ऋतुराज गायकवाडडेव्हॉन कॉनवे रॉबिन उथप्पाअंबाती रायुडू रवींद्र जडेजा शिवम दुबेड्वेन ब्राव्होमहेंद्रसिंग धोनी ख्रिस जॉर्डनअॅडम मिल्नेप्रशांत सोलंकी

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सदीपक चहर
Open in App