Join us  

IPL 2022, CSK vs KKR Predicted XI : Ravindra Jadeja व Shreyas Iyer यांची नवी इनिंग्ज; जाणून घ्या Head To Head कामगिरी अन् प्लेइंग इलेव्हन

IPL 2022 T20 Match CSK vs KKR Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला अवघ्या काही तासांत सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 5:20 PM

Open in App

गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) यांच्यात IPL 2022 चा सलामीचा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह नवी फौज घेऊन मैदानावर उतरणार आहे. महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपदाची धुरा आता रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवली आहे, तर KKR श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास लिहिण्यासाठी उत्सुक आहेत. पण, त्यांच्यासमोर खेळाडूंच्या उपलब्धतेचं मोठं आव्हान आहे. दुखापत, राष्ट्रीय कर्तव्य आणि वैयक्तिक कारणामुळे घेतलेली माघार, या समस्येंतून मार्ग काढत दोन्ही संघांना तगडी Playing XI आज मैदानावर उतरवायची आहे.

Chennai Super Kingsदीपक चहर हा दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळणार नाही आणि तो कधी कॅम्पमध्ये दाखल होईल, याची अद्याप माहितीही नाही. मोईन अली मुंबईत दाखल झालाय खरा, परंतु व्हिसा समस्येमुळे त्याला येण्यास उशीर झाला आणि तो KKR विरुद्ध खेळणार नाही. २४  तारखेला मुंबईत आल्यानंतर त्याला तीन दिवस क्वारंटाईन राहणे नियमानुसार बंधनकारक आहे. दक्षिण आफ्रिकेचा ड्वेन प्रेटोरियस हाही बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील सदस्य असल्याने हाही आयपीएलच्या पहिल्या सामन्याला मुकणार आहे.  

Kolkata Knight Ridersअॅलेक्स हेल्सने बायो बबलच्या थकव्यामुळे आयपीएलमधून माघार घेतली. त्यामुळे आरोन फिंचची निवड झाली. पण, फिंच सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यावर असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू ५ एप्रिलपर्यंत आयपीएल खेळू  शकणार नाही. पॅट कमिन्स तेथून थेड ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. ३० मार्चला दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याची शोकसभा आहे, त्यासाठी कमिन्स गेला आहे. तेथून तो मुंबईत येणार आहे आणि त्यामुळे ६ एप्रिलच्या चौथ्या सामन्याला तो उपलब्ध असणार आहे.   

 

  • २००७मध्ये रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघात विराट कोहली खेळला होता आणि आज महेंद्रसिंग धोनी CSKकडून जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.  

 

CSK Vs KKR Head To Head in the IPL

  • सामने - २६
  • चेन्नईने जिंकलेले - १७
  • कोलकाताने जिंकलेले - ८
  • अनिर्णीत - १

 

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

  • चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, महेंद्रसिंग  धोनी, ड्वेन ब्राव्हो, राजवर्धन हंगारगेकर, क्रिस जॉर्डन/महीश थीक्षणा आणि अॅडम मिल्ने.  
  • कोलकाता नाईट राइडर्स: वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नरिन, शिवम मावी, टिम साऊदी, वरुण चक्रवर्ती आणि उमेश यादव  
टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सकोलकाता नाईट रायडर्सरवींद्र जडेजाश्रेयस अय्यर
Open in App