IPL 2022 Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमधील El Calssico लढत म्हणून ओळखला जाणारा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना आज रंगणार आहे. IPL इतिहासातील दोन यशस्वी संघ समोरासमोर येणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, आयपीएल २०२२मध्ये या दोन्ही संघांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आलेय... पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईला सहापैकी एकही सामना जिंकता आलेला नाही, तर चेन्नईने सहापैकी एकच सामना जिंकलेला आहे. त्यामुळे एकीकडे अन्य संघ प्ले ऑफमधील जागा पक्की करण्यासाठी लढत असताना मुंबई-चेन्नई आतापासूनच आव्हान टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
हार्दिक पांड्या, ट्रेंट बोल्ट, कृणाल पांड्या, राहुल चहर, क्विंटन डी कॉक यांना सक्षम पर्याय शोधण्यात मुंबईचा संघ सपशेल अपयशी ठरलाय. त्यामुळेच त्यांची वाटचाल अडखळत सुरू आहे. इशान किशनसाठी बक्कळ रक्कम मोजली खरी, परंतु त्याचे दडपणा सलामीवीरावर जाणवत आहे. इशानला अद्याप साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित शर्माही झगडतोय.. जसप्रीत बुमराहला डेथ ओव्हरमध्ये साथ देणारा गोलंदाज MI कडे नाही. त्यामुळे CSKविरुद्ध मुंबई कोणती रणनीती आखतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) पदार्पण करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अशात रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या CSK नेही जोरदार तयारी केली आहे. या सामन्यापूर्वी चेन्नईला मोठा धक्का बसला. त्यांच्या ताफ्यातील न्यूझीलंडचा गोलंदाज एडम मिल्ने याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात मिल्नेला दुखापत झाली होती. पण, त्याच्या जागी चेन्नईने ज्युनियर मलिंगा Matheesha Pathirana याला करारबद्ध केले आहे. १९वर्षीय पथिराना याची गोलंदाजी शैली ही दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा ( Lasith Malinga) याच्यासारखी आहे. त्याने २०२० व २०२२च्या १९ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. २० लाखांत त्याला CSKने करारबद्ध केले आहे.
Web Title: IPL 2022 CSK vs MI : New Lasith Malinga? Matheesha Pathirana joins Chennai Super Kings as a replacement for Adam Milne, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.