Liam Livingstone Shikhar Dhawan, IPL 2022 CSK vs PBKS: लिव्हिंगस्टोन, शिखर धवनची 'दे दणादण' फलंदाजी! चेन्नईला विजयासाठी १८१ धावांचं लक्ष्य

लिव्हिंगस्टोनने IPL मध्ये झळकावलं पहिलं अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 09:36 PM2022-04-03T21:36:49+5:302022-04-03T21:37:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 CSK vs PBKS Live Liam Livingstone Shikhar Dhawan Jitesh Sharma shines as Punjab Kings set 181 runs target to Chennai Super Kings MS Dhoni Jadeja | Liam Livingstone Shikhar Dhawan, IPL 2022 CSK vs PBKS: लिव्हिंगस्टोन, शिखर धवनची 'दे दणादण' फलंदाजी! चेन्नईला विजयासाठी १८१ धावांचं लक्ष्य

Liam Livingstone Shikhar Dhawan, IPL 2022 CSK vs PBKS: लिव्हिंगस्टोन, शिखर धवनची 'दे दणादण' फलंदाजी! चेन्नईला विजयासाठी १८१ धावांचं लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Liam Livingstone Shikhar Dhawan, IPL 2022 CSK vs PBKS: चेन्नई विरूद्धच्या सामन्यात पंजाब किंग्जने दमदार फलंदाजी करत २० षटकात १८० धावा केल्या. लियम लिव्हिंगस्टोनचे अर्धशतक (६०) आणि शिखर धवन (३३), जितेश शर्मा (२६) यांच्या छोटेखानी पण दणकेबाज खेळी यांच्या जोरावर पंजाबने चेन्नई सुपर किंग्जला १८१ धावांचे मोठे आव्हान दिलं. CSK कडून ख्रिस जॉर्डन आणि प्रिटोरियस यांनी २-२ बळी टिपले.

पंजाबच्या डावाची सुरुवात खराब झाली. मयंक अग्रवाल (१) आणि भानुका राजपक्षे (९) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर शिखर धवन आणि लियम लिव्हिंगस्टोन या दोघांनी ९५ धावांची भागीदारी केली. लिव्हिंगस्टोन ६० धावांवर बाद झाला. तर शिखर धवनने ३३ धावा केल्या. या दोघांनंतर नवोदित खेळाडू जितेश शर्मा याने ३ षटकार खेचून २६ धावांची उपयुक्त खेळी केली. पण तो बाद झाल्यावर पंजाबची धावगती संथ झाली. त्यामुळे एकेवेळी २००पार मजल मारू शकणाऱ्या पंजाबला २० षटकात १८० पर्यंतच मजल मारता आली.

चेन्नईकडून ड्वेन प्रिटोरियस आणि ख्रिस जॉर्डनने प्रत्येकी दोन-दोन बळी टिपले. ड्वेन ब्राव्हो आणि रविंद्र जाडेजाने १-१ बळी टिपला. मुकेश चौधरीनेही एक बळी टिपला, पण तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात १ गडी बाद करत तब्बल ५२ धावा दिल्या.

पंजाब किंग्ज संघ: मयंक अग्रवाल (क), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा (डब्ल्यू), ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा

चेन्नई सुपर किंग्ज संघ: ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा (क), एमएस धोनी (डब्ल्यू), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, ख्रिस जॉर्डन, ड्वेन प्रिटोरियस, मुकेश चौधरी

Web Title: IPL 2022 CSK vs PBKS Live Liam Livingstone Shikhar Dhawan Jitesh Sharma shines as Punjab Kings set 181 runs target to Chennai Super Kings MS Dhoni Jadeja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.