Join us  

A proposal in the stadium, IPL 2022, CSK vs RCB Live Updates : चेन्नई-बंगळुरू लढतीत रंगला प्रेमाचा सामना; मुलीने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, Photo 

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पकड घेतलेली पाहायला मिळतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 10:23 PM

Open in App

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पकड घेतलेली पाहायला मिळतेय. ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिल्यानंतर RCBच्या ग्लेन मॅक्सवेलने दोन धक्के दिले.  पण, कॉनवेने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करून CSKचा डाव सावरला आहे. दरम्यान, पुण्याच्या MCA स्टेडियमवर प्रेमाची मॅच पाहायला मिळाली. स्टेडियमवर प्रपोज करणे यात तसं काही नवं नाही, पण CSK vs RCB लढतीत एका मुलीने चक्क गुडघ्यावर बसून हे प्रपोज केले. तिच्या प्रियकरासाठी हा सुखद धक्का ठरला.  

पुण्यात खेळलेल्या मागील लढतीत १८२ धावांची भागीदारी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे यांच्यासाठी १७४ धावांचे लक्ष्य म्हणजे काहीच नव्हते. फॉर्मात असलेल्या फलंदाजांनी सुरुवातीला सावध खेळ केला अन् स्थिरावल्यानंतर फटकेबाजी सुरू केली. या दोघांची ५४ धावांची भागीदारी शाहबाज अहमदने संपुष्टात आणली. ऋतुराज २८ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रॉबिन उथप्पाही ( १) ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्याच षटकात विकेट देऊन बसला. पाच धावांत २ विकेट्स गेल्याने CSK थोडे दडपणाखाली गेले. अंबाती रायुडूलाही ( १०) त्रिफळाचीत करून मॅक्सवेलने  RCBला मोठे यश मिळवून दिले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळुरूला विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी सुरुवात तर चांगली करून दिली. आयपीएल २०२२मध्ये या दोघांनी प्रथमच अर्धशतकी भागीदारी केली. पण, पुनरागमन करणाऱ्या मोईन अलीने RCBला पहिला धक्का दिला. ३८ धावांवर खेळणाऱ्या फॅफची विकेट त्याने घेतली. त्यानंतर आलेला ग्लेन मॅक्सवेल ( ३) रन आऊट होऊन माघारीही परतला. मोईन अलीने टाकलेला अप्रतिम चेंडू विराटच्या ( ३०) यष्टींचा  वेध घेऊन गेला. महिपाल लोम्रोर व रजत पाटिदार यांच्या ४४ धावांच्या भागीदारीने

RCB ला आधार  दिला. ड्वेन प्रेटोरियसने १६व्या षटकात रजतला २१ धावांवर बाद केले. १९व्या षटकात महिपालचे वादळ महीश थिक्सानाने रोखले. महिपाल २७ चेंडूंत ३ चौकार  व २ षटकार खेचून ४२ धावांवर माघारी परतला. थिक्सानाने त्या षटकात वनिंदू हसरंगा ( ०) व शाहबाज अहमद (  १)  यांची विकेट घेतली. थिक्सानाने ४ षटकांत २७ धावांत ३ बळी टिपले. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात १६ धावा केल्या आणि RCB ने ८ बाद १७३ धावा केल्या. कार्तिक १७ चेंडूंत २६ धावांवर नाबाद राहिला.  

टॅग्स :आयपीएल २०२२चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App