Controversial Run Out IPL 2022, CSK vs RCB Live Updates : चेंडू हातातही नव्हता तरी दिला रन आऊट; Third Umpire चा आणखी एक वादग्रस्त निर्णय?, Video 

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात अम्पायरच्या चुकीच्या निर्णयांची मालिका कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 09:29 PM2022-05-04T21:29:17+5:302022-05-04T21:29:35+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Devon Conway & Dwaine Pretorius run out to Harshal Patel, But did the ball ricochet off his hands into the stumps with a bail still on to be dislodged? Video | Controversial Run Out IPL 2022, CSK vs RCB Live Updates : चेंडू हातातही नव्हता तरी दिला रन आऊट; Third Umpire चा आणखी एक वादग्रस्त निर्णय?, Video 

Controversial Run Out IPL 2022, CSK vs RCB Live Updates : चेंडू हातातही नव्हता तरी दिला रन आऊट; Third Umpire चा आणखी एक वादग्रस्त निर्णय?, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात अम्पायरच्या चुकीच्या निर्णयांची मालिका कायम आहे. त्याला चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) हा सामना तरी कसा अपवाद ठरेल?; No Ball, Wide Ball यावरून वाद सुरू असताना आता Run Out वरून राडे होण्याची चिन्हे दिसत आहेत. बंगळुरूच्या डावातील अखेरच्या षटकात प्रकारच तसा घडला. यावरून सोशल मीडियावर पुन्हा एकदा अम्पायरवर ताशेरे ओढले जात आहेत.  

मागील सामन्यात चार विकेट्स घेणाऱ्या मुकेश चौधरीने डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात त्याने ६ धावा देताना CSK ला सकारात्मक सुरुवात करून दिली.विराट व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी त्यानंतर CSKच्या गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली.  आयपीएल २०२२मधील विराट व फॅफने प्रथमच अर्धशतकी भागीदारी केली. मोईन अलीने ( Moeen Ali) सामन्याला कलाटणी दिली. अलीने फॅफची ( ३८) विकेट घेतली.  ग्लेन मॅक्सवेल ( ३) रन आऊट झाला. मोईन अलीने टाकलेला अप्रतिम चेंडू विराटच्या ( ३०) यष्टींचा  वेध घेऊन गेला. महिपाल लोम्रोर व रजत पाटिदार यांच्या ४४ धावांच्या भागीदारीने RCB ला आधार  दिला. ड्वेन प्रेटोरियसने १६व्या षटकात रजतला २१ धावांवर बाद केले. 

महिपाल चांगले फटके मारत होता आणि त्याचा झेल टिपण्याच्या प्रयत्नात रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja Injured) दुखापतग्रस्त झाला. १९व्या षटकात महिपालचे वादळ महीश थिक्सानाने रोखले. महिपाल २७ चेंडूंत ३ चौकार  व २ षटकार खेचून ४२ धावांवर माघारी परतला. थिक्सानाने त्या षटकात वनिंदू हसरंगा ( ०) व शाहबाज अहमद (  १)  यांची विकेट घेतली. थिक्सानाने ४ षटकांत २७ धावांत ३ बळी टिपले. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकात १६ धावा केल्या आणि RCB ने ८ बाद १७३ धावा केल्या. कार्तिक १७ चेंडूंत २६ धावांवर नाबाद राहिला. २०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कार्तिकने फटका मारला, पण तो धाव घेण्यासाठी पळाला नाही. मात्र, नॉन स्ट्रायकर एंडला असलेला हर्षल पटेल त्याच्या क्रिजपर्यंत पोहोचला. कार्तिकने त्याला माघारी पाठवले आणि तेव्हा कॉनवेच्या थ्रो वर प्रेटोरियसने त्याला रन आऊट केले. पण, चेंडू प्रेटोरियसच्या हातातही नव्हता अन् तिसऱ्या अम्पायरने ही विकेट दिली.

पाहा तुम्हाला काय वाटतं?

Web Title: IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Devon Conway & Dwaine Pretorius run out to Harshal Patel, But did the ball ricochet off his hands into the stumps with a bail still on to be dislodged? Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.