IPL 2022 CSK vs RCB Live Updates : RCB आयपीएल जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही!, CSK vs RCB सामन्यात 'पोस्टर गर्ल'ची चर्चा

IPL 2022  Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : ऋतुराज गायकवाडला सलग पाचव्या सामन्यात आलेले अपयश चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढवणारी ठरतेय...

By स्वदेश घाणेकर | Published: April 12, 2022 08:48 PM2022-04-12T20:48:32+5:302022-04-13T12:51:01+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 CSK vs RCB Live Updates : Not getting married till RCB wins IPL Trophy, Poster girl viral during CSK vs RCB match  | IPL 2022 CSK vs RCB Live Updates : RCB आयपीएल जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही!, CSK vs RCB सामन्यात 'पोस्टर गर्ल'ची चर्चा

IPL 2022 CSK vs RCB Live Updates : RCB आयपीएल जिंकत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही!, CSK vs RCB सामन्यात 'पोस्टर गर्ल'ची चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022  Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : ऋतुराज गायकवाडला सलग पाचव्या सामन्यात आलेले अपयश चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी वाढवणारी ठरतेय... रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या आजच्या सामन्यातही त्याला अपयश आले, परंतु रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी CSKच्या डावाला आकार दिला आहे. 2 बाद 36 वरून या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी जवळपास शतकी धावा जोडल्या आहेत. पण, या खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा डी वाय पाटील स्टेडियमवर 'पोस्टर गर्ल'ची चर्चा रंगली.

गतविजेता चेन्नई सुपर किंग्स ( CSK)  इंडियन प्रीमिअर लीगच्या 15 व्या पर्वात अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे.  चेन्नईचा माजी सहकारी फॅफ ड्यू प्लेसिस आज त्यांच्यासमोर कर्णधार म्हणून उभा राहिला. फॅफने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामना हा CSK चा आयपीएलमधील 200 वा सामना आहे आणि मुंबई इंडियन्स, RCB, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यानंतर असा पराक्रम करणारा हा सहावा संघ ठरलाय. CSKने 199 सामन्यांपैकी 117 मध्ये विजय मिळवले आहेत, तर 80 मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. 


ऋतुराज आज चांगल्या टचमध्ये दिसत होता, परंतु अम्पायर कॉल असल्यामुळे त्याला 17 धावांवर LBW होऊन माघारी जावे लागले. RCBकडून पदार्पण करणाऱ्या जोश हेझवूडने त्याची विकेट घेतली. त्यानंतर मोईन अली ( 3) धावबाद झाला. त्यानंतर रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी 52 चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. दुबेने 31, तर रॉबिनने 32 चेंडूंत अर्धशतक झळकावले. या दोघांनी 11-15 या पाच षटकांत 73 धावा कुटल्या. याचवेळी ही तरुणी फेमस झाली...

दरम्यान अमित मिश्राला ( Amit Mishra) या मुलीच्या पालकांची चिंता लागली आहे.

Web Title: IPL 2022 CSK vs RCB Live Updates : Not getting married till RCB wins IPL Trophy, Poster girl viral during CSK vs RCB match 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.