Join us  

Harshal Patel IPL 2022 CSK vs RCB Live Updates : हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन झालं, RCBच्या खेळाडूंनी बघा काय केलं; सोशल मीडियावर एकच चर्चा

Harshal Patel बहिणीच्या निधनामुळे पटेल त्याच्या घरी परतला आहे आणि त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळत नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 10:24 PM

Open in App

IPL 2022  Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : चेन्नई सुपर किंग्स आज जिंकायचच हा निर्धार करूनच मैदानावर उतरला होता. त्यांच्या निश्चयाला सुरुवातीला धक्के बसले, परंतु रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी आज कमाल केली. दोघांनी तिसऱ्या  विकेटसाठी 74 चेंडूंत 165 धावांची विक्रमी भागीदारी केली. आजच्या सामन्यात हर्षल पटेलची ( Harshal Patel) उणीव रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रकर्षाने जाणवली. बहिणीच्या निधनामुळे पटेल त्याच्या घरी परतला आहे आणि त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळत नाही. 

ऋतुराज गायकवाड ( 17) व मोईन अली ( 3) झटपट माघारी परतल्याने चेन्नईची अवस्था 2 बाद 36 अशी झाली. रॉबिन उथप्पा व शिवम दुबे यांनी दमदार खेळ केला. 81 धावांवर असताना उथप्पाला जीवदान मिळाले. उथप्पा व दुबे यांनी RCB विरुद्ध तिसऱ्या विकेटसाठीही सर्वोत्तम भागीदारीची नोंद केली. याआधी केन विलियम्सन व मनीष पांडे यांनी 2018मध्ये 135 धावा चोपल्या होत्या.उथप्पा 50 चेंडूंत 4 चौकार व 9 षटकारांसह 89 धावांवर बाद झाला.दुबे व उथप्पा यांची 165 धावांची भागीदारी ही आयपीएलमधील तिसऱ्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी कुमार संगकारा व कॅमेरून व्हाईट यांची 2012साली नोंदवलेली 157 धावांचा विक्रम मोडला.  दुबे 46 चेंडूंत 5 चौकार व 8 षटकारांसह 95  धावांवर  नाबाद राहिला. चेन्नईने 4 बाद 216 धावा केल्या. 

हर्षलच्या बहिणीचे शनिवारी निधन झाले. त्यामुळे तो RCBच्या बायो-बबलमधून बाहेर पडला. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पटेलने संघ सोडला असून तो घरी परतला आहे. तो काही दिवस घरी थांबून मग पुन्हा संघात परतणार आहे. हर्षलच्या बहिणीचा शनिवारीच मृत्यू झाला होता. तिची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नव्हती. हर्षल पटेलच्या बहिणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी RCBच्या सर्व खेळाडूंनी दंडावर काळी फित बांधली होती. त्यांच्या या कृतीने चाहत्यांचे मनं जिंकली. 

टॅग्स :आयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचेन्नई सुपर किंग्स
Open in App